सर्वात लहान करोडपती असलेल्या ईशा अंबानीची संपत्ती आहे किती?

मुंबई : भारतीतल सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिचा साखरपुडा नुकताच पार पडला. आनंद पीरामल यांच्यासोबत तिचा साखरपुडा झाला. इटलीतपार पडलेल्या या साखरपुड्याला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. वर्षाच्या शेवटी ईशा अंबानीचा विवाह देखील होणार आहे. लग्न खास पद्धतीने करण्यासाठी ईशा स्वत: ही जागा ठरवणार आहे. ईशाचं प्री-वेडिंग सेलेब्रेशन उदयपूरमध्ये होणार आहे. डिसेंबरमध्ये अंबानींच्या या लाडक्या लेकीचा विवाहसोहळा होणार आहे. अंबानी कुटुंब म्हणजे लग्न साधंसुधं नसणार. गरिबांची लाखो लग्न होतील इतका म्हणजेच पाण्यासारखा पैसा पोरीच्या लग्नात वाहणार आहे. आतापर्यंतच्या साखरपुडा आणि प्री वेडिंगचा दिमाख पाहिला तर याची प्रचिती सहज कुणालाही येऊ शकते. त्यामुळे अंबानी कन्येचा विवाहसोहळा आजपर्यंतचा सर्वात अविस्मरणीय विवाहसोहळा ठरू शकतो. 

 सर्वात कमी वयाची बिझनेस वुमन-

आशिया खंडातील 12 सगळ्यात पॉवरफुल बिजनेस वुमनच्या यादीत ईशा अंबानी देखील मागे नाही. ईशा कोणत्याही राजकुमारी पेक्षा कमी नाही हे सगळ्यांना माहीत आहेच. ईशाने खूपच कमी वयात मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलगी म्हणून नाही तर आपल्या मेहनतीच्या जोरावर एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे असं कित्येकांना वाटतं. अनेकांना तीनं हे वडिलांच्या जीवावर केल्याचं देखील वाटतं. 2015 मध्ये ईशा अंबानीचं नाव फोर्ब्सच्या सर्वात लहान अरबपती बिजनेस वुमनच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होतं. 2018 मध्ये फोर्ब्सच्या उत्तराधिकारी यांच्या यादीत देखील ईशा दुसऱ्या स्थानी होती.

ईशा कुणाची सून होणार?

ईशा अंबानी लवकरच पिरामल कुटुंबाची सून होणार आहे. आनंद पिरामलसोबत तिचा विवाहसोहळा पार पडणार आहे. सध्या ईशा अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये अनेक महत्त्वाची पदं सांभाळत आहे. ईशा अंबानी दरवर्षी 4710 कोटी रुपयांची कमाई देखील करते. ईशा 16 वर्षाची असतानाच रिलाय न्स इंडस्ट्रीजमध्ये ती 80 मिलियन डॉलरची मालकीन होती. तुम्हाला ही माहिती वाचून नक्कीच धक्का बसला असेल.

दोन कंपन्यांची डायरेक्टर ईशा-

ईशा अंबानी एक यशस्वी बिजनेस वुमन आहे. 1991 साली तिचा जन्म झाला. भाऊ आकाश आणि ती जुळी भावंडं आहेत. ईशा रिलायंसच्या टेलिकॉम आणि रिटेल कंपन्यांची डायरेक्टर आहे. ईशाने धीरूभाई इंटरनॅशनल शाळेत शिक्षण घेतलं. यानंतर 2013 मध्ये येल यूनिवर्सिटीमधून तिने सायकोलॉजी आणि एशियन स्टडीजमध्ये ग्रॅज्यूएशन केलं आहे. त्यामुळे ईशाचं शिक्षण देखील चांगलं झालं आहे. 

16 वर्षात बनली श्रीमंत-

ग्रॅज्यूएशननंतर ईशाने अमेरिकेच्या ग्लोबल कन्सलटेंसी फर्म मकिंसेमध्ये काम केलं. येथे तिने बिझनेस अॅनालिस्ट म्हणून काम केलं. यानंतर रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलची ती डायरेक्टर बनली. 16 वर्षात ती गडगंज श्रीमंत बनली. आज तिच्याकडे पाण्यासारखा पैसा आहे.