इशांत शर्माचं अर्धशतक अन् कोहलीच धमाकेदार ‘सेलिब्रेशन’!

किंग्स्टन : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने विंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यावर आपली पकड मजबूत केली. दुसऱ्या दिवसअखेर विंडीजची अवस्था 7 बाद 87 अशी दयनीय झाली. जसप्रीत बुमराहने हॅटट्रीक घेत वेस्ट इंडिजचे सहा गडी माघारी धाडले. त्यामुळे भारताकडे अजुनही 329 धावांची आघाडी आहे.

भारताचा पहिला डाव 416 धावांत आटोपला. भारताच्या डावात चर्चा झाली ती शतकवीर हनुमा विहारी आणि इशांत शर्माची. सगळीकडे बोलबाला झाला तो नवव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरून अर्धशतक झळकावणाऱ्या इशांत शर्माचा.. इशांतने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठोकले.

इशांतने 80 चेंडूत 57 धावांची दमदार खेळी केली. इशांतने केलेल्या अर्धशतकानंतर पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या सहकाऱ्यांनी त्याचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

कर्णधार विराट कोहलीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. इशांतचे अर्धशतक पूर्ण होताच विराटने उडी मारून आणि हात वर करून त्याचे अर्धशतक साजरे केले. तसेच टाळ्या वाजवून त्याच्या खेळीला मनसोक्त दाद दिली. खरे तर अर्धशतक इशांतचे झाले होते पण इशांतपेक्षा जास्त कोहलीने ते सेलिब्रेट केलेले पाहायला मिळाले. 

 

महत्वाच्या बातम्या-