‘हा’ गोलंदाज मोडणार कपिल देव, जहीर खान, हरभजन सिंग या दिग्गजांचा विक्रम!

किंग्स्टन : वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना होणार आहे. हा सामना सबिना पार्क, किंग्स्टन येथे होणार आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला खास पराक्रम करण्याची संधी आहे. इशांतने 1 बळी मिळवला की तो विक्रमाला गवसणी घालेल.

सध्या तो आशिया बाहेर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाजांच्या यादीत माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्यासह विभागून अव्वल क्रमांकावर आहे. इशांत आणि कपिल देव यांनी आशिया खंडाबाहेर कसोटीत प्रत्येकी 155 विकेट्स घेतल्या आहेत.

विशेष म्हणजे कपिल देव यांनी आशिया खंडाबाहेर 45 कसोटी सामने खेळताना 155 विकेट्स घेतल्या आहेत. तर इशांतनेही आत्तापर्यंत 45 कसोटी सामने आशिया खंडाबाहेर खेळले असून त्यानेही 155 विकेट्स घेतल्या आहेत.

आशिया खंडाबाहेर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या एकूण भारतीय गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर माजी फिरकीपटू अनिल कुंबळे आहे. त्याने 200 विकेट्स आशिया खंडाबाहेर घेतल्या आहेत. आशियाबाहेर 200 विकेट्स घेणारा तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे. त्याच्यापाठोपाठ कपिल देव आणि इशांत आहेत. 

आशियाबाहेर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –

200 – अनिल कुंबळे (50 सामने)

155 – कपिल देव (45 सामने)

155 – इशांत शर्मा (45 सामने)

147 – झहिर खान (38 सामने)

123 – बिशनसिंग बेदी (34 सामने)

117 – हरभजन सिंग (32 सामने)

117 – जवागल श्रीनाथ (31 सामने)

महत्वाच्या बातम्या-