वाह रं पठ्ठ्या! एका दिवसात तोडला तब्बल 16 टन ऊस, कोयत्याच्या जोरावर ‘ईश्वरी’ पराक्रम

सांगली | देशामधील साखर कारखान्यांपैकी सुमारे 36 टक्के साखर कारखाने महाराष्ट्रात आहेत. साखर उद्योगाचा हा डोलारा, ऊस शेतकरी आणि ऊसतोड करणाऱ्या मजूरांच्या (Sugarcane laborer) जिवावर उभा आहे.

उसतोड कामगार महाराष्ट्राच्या दुष्काळी भागांतून वर्षातील सहा महिने गावातून स्थलांतर करून ऊस उत्पादक प्रदेशात कामासाठी स्थलांतर करून जातात.

अशातच एका ऊसतोड मजुराने एक मोठा विक्रम केला. एका ऊसतोड मजुराने एकट्याने एका दिवसात तब्बल 20 गुंठ्यातील 16 टन ऊस तोडून विक्रम मोठा विक्रम केला आहे.

ईश्वर रामचंद्र सांगोलकर नावाच्या ऊसतोड कामगाराने फक्त कोयत्याच्या जोरावर हा पराक्रम केला आहे. ईश्वर यांचं वय सध्या 50 वर्ष आहे. या वयात त्यांनी हा पराक्रम केलाय.

केवळ दोन बिस्किट पुडे आणि ताक पिऊन 20 गुंठ्यातील 16 टन ऊस आडवा केला. या कामाबद्दल ईश्वर सांगोलकर यांचा सत्कार वारणा साखर कारखाना प्रशासनाने केला आहे.

मागील पंधरा दिवसांपासून कुंडलवाडी येथे ऊसतोड सुरु आहे. त्यामुळे जत तालुक्यातील खैराव गावातील राहणाऱ्या पोटापाण्यासाठी ऊसतोडीच्या कामासाठी आले.

दरम्यान, कारखान्याचे शेती अधिकारी प्रमोद पाटील आणि ऊस अधिकारी विजय कोळी यांनी स्वत: जाऊन ईश्वर रामचंद्र सांगोलकर यांचा सत्कार केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

फटे स्कॅम! शेअर मार्केटच्या नावावर बार्शीच्या विशालनं लावला कोट्यावधींचा चुना

“कंडोमपेक्षा कोरोना टेस्ट महत्त्वाची, सेक्सपूर्वी हे नक्की करा”

किरण माने प्रकरणाला वेगळं वळण! सहकलाकारांनी केलेल्या आरोपामुळं खळबळ

 विराटनंतर कॅप्टन कोण???, लिटल मास्टरने घेतलं ‘या’ खेळाडूचं नाव

अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद