“संजय राऊतांची उच्च प्रतिच्या गांजाची नशा अजून उतरली नाही का?”

औरंगाबाद | पैठण तालुक्यातील तोंडाळी गावतील शेतवस्तीवर काही दरोडेखोरांनी बुधवार 20 ऑगस्ट रोजी चोरी केली त्या दरोडेखोरांनी केवळ चोरीच केली नसून, त्यांनी दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केला असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घटनेनंतर राज्यात चर्चांना उधाण आलं आहे.

या प्रकरणानंतर भापच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पिडीत महिलांची भेट घेतली तसेच त्यांनी त्यावेळी राज्यातील महाविकास आघाडीवर आणि शिवसेना पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

संजय राऊत यांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नाही का? औरंगाबादत्या बलात्काराच्या घटनेवर संजय राऊत यांनी एक शब्दही काढला नाही, असं म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर चांगलत

राज्यात रोज महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. राज्यात एकही जिल्हा असा नाही जिथे महिलांचे शोषण होत नाही. नवीन कायदा कधी येणार माहिती नाही, कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा आहे का? असा सवालही त्यांना केला.

तसेच. पैठण तालुक्यातील पीडित महिलांना सरकार योजनांचा फायदा होईल त्याबाबत पावलं उचलावी, अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

वडेट्टीवारांनी बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये- नितीन गडकरी

‘साहेब…आता मलाच मुख्यमंत्री करा’; नारायण राणेंचा गौप्यस्फोट

“2014 च्या निवडणुकीत थापा मारून सत्ता मिळवली तो नेता नाही तर अभिनेता निघाला”

आम्हाला तिघांना ग्रहण लागलं होतं, अजित पवारांनी विश्वास ठेवला, नाहीतर…- धनंजय मुंडे

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; महानगरपालिकेने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय