Top news

“इस्रायल कोरोना विरोधात लस निर्मितीपासून काही पावलं दूर”

इस्रायल | कोरोना व्हायरसविरोधात लस निर्मितीमध्ये इस्रायल महत्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चने करोना व्हायरस अ‍ॅंटीबॉडी किंवा पॅसिव्ह लस विकसित करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. जेरुसलेम पोस्टने हे वृत्त दिलं आहे.

कोरोना विरोधात लस निर्मितीमध्ये इस्रायल महत्वाच्या टप्प्यावर पोहोचल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली.

अँटीबॉडी व्हायरसवर हल्ला करुन व्हायरसला शरीरामध्येच संपवून टाकतात, अशी माहिती संशोधकांच्या टीमने इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे. इन्स्टिट्यूट आता अ‍ॅंटीबॉडीसाठी पेटंट मिळवण्याबरोबरच व्यावसायिक निर्मितीसाठी काँन्ट्रॅक्ट करण्याच्या प्रयत्नात आहे, असं इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बायोलॉजिकल इन्स्टिट्यूट स्टाफने महत्वपूर्ण यश मिळवलं असून त्यांचा आम्हाला अभिमान आहे, असं संरक्षण मंत्री नाफताली बेन्नेट म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भक्तांकडे या प्रश्नाचं उत्तर आहे का?”

-‘तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल आणि परदेशात अडकला असाल तर…’; ठाकरे सरकारचं आवाहन

-‘या’ राज्यात दारूवर 70 टक्के कोरोना फी; सरकारच्या निर्णयाने तळीरामांची पंचायत

-“दारू विक्रीसंबंधी केंद्राच्या सूचना असल्या तरी राज्य सरकारने घाई करू नये”

-‘नीट’ आणि ‘जेईई-मेन्स’ परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर