एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं; साखरझोपेत असताना 3 सख्ख्या भावांचा सापानं केला घात

लखनौ | उत्तर प्रदेश मधील सीतापूर येथून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन भाऊ घरात झोपलेले असताना सापानं तिघांनाही दंश केला आहे. यामुळे तिन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे.

तीन भाऊ रात्री घरात झोपलेले होते. यावेळी अचानक एक साप घरात शिरला अन् होत्याचं नव्हतं झालं. सापानं तीनही भावांना दंश केला. रात्री आईला जाग आल्यानंतर तिनं मुलांना विचित्र अवस्थेत पडलेलं पाहिलं. मुलांना बेशुद्ध अवस्थेत पाहून आईने टाहो फोडला यामुळे शेजारील लोक घटनास्थळी जमा झाले.

तिन्ही भावांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, सापाचं विष संपूर्ण अंगात भिनल्यानं उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केलं. या घटनेमुळे परिसरात सापाची दहशत तयार झाली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तीनही मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदनाचे अहवाल आल्यानंतर पोलीस पुढील तपास करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

अखेर ठरलं, T-20 विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे, तर स्पर्धा होणार या वर्षी!

तुम्हाला मी खुपतो पण तुमचं पितळ एका दिवशी उघडं करणार; अविनाश जाधव आक्रमक

चांगली बातमी! अवघ्या ‘इतक्या’ रूपयात कोरोनाची लस होणार उपलब्ध!

एअर इंडियाच्या विमानाला केरळमध्ये भीषण अपघात; विमानाचे झाले दोन तुकडे

सुशांत सिंहची हत्या झाली असेल तर मग…; रोहित पवारांनी भाजपला सुनावलं