“सोनाराने कान टोचले तर दुखत नाही, बरं झालं मित्रपक्षानेच राऊतांची कान उघडणी केली”

मुंबई | काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यूपीएचे अध्यक्षावरुन एक वक्तव्य केलं होतं. आतापर्यंत यूपीएचे नेतृत्व काँग्रेसने केलं. मात्र देशामध्ये विरोधी पक्षाची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि या आघाडीमध्ये जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावे असं वाटत असेल, तर यूपीएचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी करावं, अशी आमची इच्छा असल्याचं संजय राऊत म्हणाले होते.

संजय राऊत याच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात एक ठिंणगी पडली आहे. तसेच त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. काँग्रेसने त्यांच्या भाष्यावरुन नाराजीही व्यक्त केली.

शिवसेना यूपीएचा भाग नाही. त्यामुळे यूपीएच्या अध्यक्षाबाबत बोलण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली. संजय राऊत यांना सतत काहीतरी चांगलं लिहावं लागत. म्हणून ते अशा मागण्या करत असतात. शिवसेनेने आधी यूपीएमध्ये सामिल व्हावं त्यानंतर अशी मागणी करावी, असं सचिन सावंत यांनी म्हटलं.

त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांना यूपीएबाबत बोलण्याचा आधिकार कोणी दिला, अशा शब्दात राऊतांना मलिक यांनी सुनावले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यावर बोलल्यानंतर आता भाजपनेही या वादात उडी घेतली आहे. भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर आकाऊंटवरुन एक ट्विट केलं आहे.

सोनाराने कान टोचले तर दुखत नाही, बरं झालं मित्रपक्षानेच राऊतांची कान उघडणी केली. इतर कोणी काही बोलल असतं, तर सामनात आणखी एका अग्रलेखाची जागा वाढली असती.

तसेच संजय राऊत तुम्ही ना यूपीएचे, ना एनडीएचे तुम्ही नक्की कुठले?, असा टोला भाजपने संजय राऊत यांना लगावला आहे. त्यासोबतच ट्विट करताना भाजपने एक फोटोही जोडला आहे. त्यावर ‘आमच्या इथे कोणत्याही पक्षाच्या बाजूने बोलणारा माणूस मिळेल’, असं लिहीलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ अभिनेत्रीच्या “बिंदी आणि बिकनी” फोटोचा सोशल…

‘आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे’;…

पोलीस दलाला जनतेच्या मनातून उतरवणाऱ्यांची गय करणार नाही…

मोठी बातमी! आता ‘या’ जिल्ह्यातही लॉकडाऊन जाहीर

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’…