आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड, ‘या’ छुप्या पद्धतीनं काढून टाकलं जातंय

पुणे | कोरोनाच्या या कठीण काळात कोणत्याही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाका, असे आदेश केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी सगळ्याच कंपन्यांनी दिले आहेत. मात्र कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यासाठी पुण्यातील आय.टी. कंपन्यांनी नवा मार्ग अवलंबला आहे.

राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना थेट घरी पाठवता येत नसल्याने बेंच रिसोर्स करून तीन महिन्यांनी घरचा रस्ता दाखवण्यात येत आहे. पुण्यातील आय.टी. कंपन्यांनी बेंच रिसोर्स करून कर्मचाऱ्यांना घरी बसवण्याचा पर्याय अवलंबल्याने कामगार वर्ग धास्तावला आहे. आयटी कंपन्यांमध्ये काही कर्मचारी राखीव असतात. त्यांना बेंच रिसोर्स असं म्हणतात.

धास्तावलेल्या कर्मचाऱ्यांनी कंपन्यांविरोधात दाद मागितल्यानंतर संबंधित कंपन्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून कमी करू नका नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कंपन्यांना देण्यात आला आहे.

दरम्यान, सुरूवातीला कर्मचाऱ्यांना बेंचवर बसवलं जातं. आणि त्यानंतर राजीनामा देण्यास भाग पाडलं जातं किंवा बळजबरीने राजीनामा मागितला जातो. त्यामुळे कर्मचारी कायमच भीतीच्या वातावरणात असतात, असं एनआयटी एम्पॉयी सेनेच्या हरप्रीत यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-“मजुरांच्या गाड्यांना बंगालमध्ये प्रवेश न देणं हे माणुसकीला धरून नाही”

-आज फिर हमने दिल को समझाया; दुखा:त बुडालेल्या मेधा कुलकर्णींचं ट्विट

-‘अरे वाघांनो असं रडताय काय मी आहे ना…’ दुखावलेल्या कार्यकर्त्यांची पंकजांनी घातली समजूत

-देशातल्या मुस्लिमांना दुय्यम नागरिक ठरवता येणार नाही- संजय राऊत

-देशातल्या मुस्लिमांना दुय्यम नागरिक ठरवता येणार नाही- संजय राऊत