नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय आणि केलेल्या प्रत्येक कृतीवर विरोधकांकडून जोरदार टीका होत असते. नरेंद्र मोदींना सतत खलनायक ठरवणं चुकीचं आहे, असं मत काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी व्यक्त केलं आहे.
नरेंद्र मोदींचा वारंवार खलनायक असा उल्लेख करून विरोधक त्यांचीच मदत करत आहेत, असं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींना प्रत्येक वेळी व्हिलन ठरवून त्यांच्यावर टीका करत राहिल्यानं काहीही हाती लागणार नाही, असा सल्ला रमेश यांनी दिला होता.
नरेंद्र मोदींच्या सरकारचे मॉडेल हे पूर्णपणे नकारात्मक नाही. त्यांनी केलेल्या कार्याचं महत्त्व नाकारणं आणि प्रत्येकवेळी त्यांनी खलनायक म्हणून सादर केल्यानं काहीही हाती लागणार नाही. मोदींचे कार्य आणि 2014 ते 2019 या काळात त्यांनी जे काही केले त्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, ज्यामुळे ते पुन्हा सरकारमध्ये परतले आहेत, असं रमेश म्हणाले होते.
मोदी जे बोलतात ती भाषा त्यांना लोकांशी जोडते. असं राजकीय विश्लेषक कपिल सतीश कोमीरेड्डी यांच्या पुस्तकाचे प्रकाशनावेळी जयराम रमेश बोलत होते.
नरेंद्र मोदी अशी कामं करत आहेत ज्याची जनतेकडून प्रशंसा होत आहे, अशी कामे याआधी झालेली नाहीत. जोपर्यंत हे आम्ही मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा सामना करू शकणार नाही, असंही रमेश म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-स्टेशनवर भिक मागणाऱ्या महिलेचं पहिलं गाणं हिमेशसोबत झालं रेकॉर्ड
-जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांना मनसे कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न!
-सर्वात कमी सरासरी असणाऱ्या ‘या’ खेळाडूंनी सावरला भारताचा डाव!
-काँग्रेसचा ‘हा’ नेता म्हणतो; नरेंद्र मोदींचा पराभव करणं अशक्यच
-उदयनराजेंच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा; रणजित निंबाळकर म्हणतात…