मुंबई | काल राज्यातील अनेक भागात आज विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलनं केली आहेत. मुंबईतील धारावी, नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबादमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली.
अचानक विद्यार्थी उतल्यानं पोलिसांची चांगलीच तारंबळ उडाल्याचं पहायला मिळालं. आंदोलनामागे इनस्टाग्रामचा इन्फ्लुएन्सर हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) या नावाने परिचित असलेला विकास पाठक असल्याची समोर आलं होतं.
दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी हिंदुस्तानी भाऊने यूट्युबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन काल केलं होतं. त्यानंतर चांगलाच वाद पेटल्याचं पहायला मिळालं.
विकास पाठकविरोधात धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील येताना दिसत आहेत.
पुण्याच्या डाॅशिंग नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला रामराम ठोकून राष्ट्रवादीचं घडयाळ हाती बांधल होतं. त्यानंतर रूपाली पाटील आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.
अशातच आता ठोंबरे पाटील यांनी हिंदुस्तानी भाऊवर कडाडून टीका केली आहे.प्रसिद्धीसाठी विद्यार्थ्यांना भडकवून त्यांच्या जीवाशी खेळणारा भडखाऊ भाईजानला कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे, असं रूपाली पाटील म्हणाल्या आहेत.
त्याच्यावर तात्काळ कारवाई करून त्याची मस्ती जिरवावी, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट करत केली आहे.
दरम्यान, दहावी आणि बारावीच्या मुलांनी अशा प्रकारे रस्त्यावर येऊन राडा घातल्याने सोशल मीडियावर संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रणबीरचा ‘हा’ चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोडली नोकरी, जाणून घ्या काय होतं कारण
नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळताच निलेश राणेंचा न्यायालयाबाहेर राडा, पोलिसांशी बाचाबाची
Budget 2022 | मोदी सरकारने महिलांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात केल्या ‘या’ 3 मोठ्या घोषणा
Budget 2022 | मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग?, जाणून घ्या एका क्लिकवर
क्रिप्टोकरन्सी विकत घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; मोदी सरकारने केली मोठी घोषणा