मुंबई | सध्या महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी नेते यांच्यात चांगलेच आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत आहे. नुकतंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांना फटकारलं आहे.
निलेश राणे यांनी सोशल मीडियावर ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संज्या किती जरी शेती कायद्यांचा विषय घेऊन नाचलास तरी महाराष्ट्रात शिवसेनेला आता कुत्र भीक घालणार नाही, अशा खोचक शब्दांत निलेश राणेंनी संजय राऊतांना फटकारलं आहे.
पुढे निलेश राणे यांनी म्हटलं की, देशाच्या स्वातंत्र्या वर असा बोलतो जसं ह्याच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळालं, सत्तेचा गैरवापर करून एका महिलेला छळणारा देशाच्या पंतप्रधानांवर बोलतो ह्या पेक्षा दुर्भाग्य काय?
निलेश राणेंनी केलेल्या या ट्विटवर सध्या अनेक पडसाद उमटताना दिसत आहे. अनेकजण टीकाही करताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला अखेर आता मोठं यश मिळालं आहे. यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे आरोपांची मालिका सुरु झाली आहे.
आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी राऊतांनी भाजपवर हल्लाबोल करत स्वातंत्र्याविषयी जोरदार टीका केली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं, सात वर्षांनंतर पंतप्रधान मोदी झुकले, अशा अनेक टीका सध्या केल्या जात आहेत. राजकीय वर्तुळात सध्या अनेक शाब्दिक वाद रंगला आहे.
दरम्यान, निलेश राणेंनी केलेल्या टीकेवर आता संजय राऊत काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संज्या किती जरी शेती कायद्यांचा विषय घेऊन नाचलास तरी महाराष्ट्रात शिवसेनेला आता कुत्र भिक घालणार नाही. देशाच्या स्वातंत्र्या वर असा बोलतो जसं ह्याच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळालं, सत्तेचा गैरवापर करून एका महिलेला छळणारा देशाच्या पंतप्रधानांवर बोलतो ह्या पेक्षा दुर्भाग्य काय?
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 20, 2021
महत्त्वाच्या बातम्या –
एसटी महामंडळाची कारवाई, तब्बल ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना केलं निलंबित
पुढील तीन दिवस ‘या’ भागात पावसाळी वातावरण, हवामान खात्याचा इशारा
“पंतप्रधान मोदी येणार, त्यामुळे तीन दिवस बाल्कनीत कपडे वाळत घालू नका”
इतिहास घडला! कमला हॅरिस बनल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष
पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, वाचा आजचे ताजे दर