मुंबई | रविवार, दि. 13 ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे महामार्गावर मराठा आरक्षणाचा आवाज उठविणारे शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मोटे (Vinayak Mote) यांचा अपघात झाला होता.
हा अपघात येवढा मोठा आणि भीषण होता की, यात मेटे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मराठा समाजाला मोठा धक्का बसला आणि त्यांच्या आकस्मित निधनाने सर्वांनी हळहळ व्यक्त केली.
आता शिवसंग्रामचे कार्यकर्ते त्यांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. हा अपघात नसून घातपात असल्याचा त्यांनी दावा केला आहे. मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती विनायक मेटे (Dr. Jyoti Vinayak Mete) यांनी देखील संशय व्यक्त केला आहे.
डॉ. ज्योती यांनी अपघात घडल्यानंतरच्या घडामोडी आणि वैद्यकीय गोष्टींचा संदर्भ देत मेटे यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला आहे. मेडिकल टर्मिनोलॉजीनुसार मृत्यूनंतर मृताचा चेहरा पांढरा पडत नाही, तो थोड्या वेळाने पांढरा पडतो. परंतु मेटे यांचा चेहरा अतोनात पांढरा पडला होता, असे डॉ. ज्योती म्हणाल्या.
मला त्यांच्या अपघाताची बातमी कळाल्यानंतर मी ताबडतोब फोन फिरवले. परंतु विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) आणि अन्य अधिकाऱ्यांनी फोन घेतला नाही. मी ड्रायवरला देखील फोन केला, पण त्यांने मला अपघाताचे लोकेशन पाठविले नसल्याचे डॉ. ज्योती म्हणाल्या.
मी ड्रायवरला व्हॉट्सेपवर लोकेशन पाठवायला सांगितले पण त्याने ते पाठविले नाही. मग मी वाहतुक पोलिसांना फोन केला. त्यांच्याकडून मेटे यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली.
तसेच अपघात घडल्यानंतर जवळजवळ मी पाऊन तासाने त्याठिकाणी पोहोचले परंतु ही पाऊन तासापूर्वी घडलेली घटना नव्ह्ती. ही घटना घडून दोन तास उलटून गेल्याचे मला वाटते, असे डॉ. ज्योती यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसग्रामचे अध्यक्ष आणि मराठा आरक्षणाचा आवाज असलेले मेटे यांच्यावर त्यांच्या बीड जिल्ह्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या –
स्वतंत्र्यदिनी सावरकर आणि टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन वाद, वाचा सविस्तर बातमी…
“स्वतंत्र्य भारतात जन्माला आलेला मी पहिला…” – नरेंद्र मोदी
पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहन संपन्न
शिवसेनाभवन बांधण्यावरुन शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा दणका
“त्या दिवशी हे सरकार कोसळेल”, अजित पवारांची संख्याबळाच्या मुद्यावर भविष्यवाणी