Top news विदेश

‘ही’ असेल जगातील चौथी मोठी वाहन कंपनी, वर्षाला करणार तब्बल 87 लाख वाहन निर्मिती

पॅरिस | कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच उउद्योग धंद्यांना मोठा धक्का बसला होता. या काळात सर्व देशांच्या अर्थव्यवस्था पि.छाडीवर गेल्या होत्या. मात्र, आता कोरोनानंतर पून्हा एकदा सर्व देशांच्या अर्थव्यवस्था सुरळीत होऊ लागल्या आहेत.

कोरोनाकाळात वाहन उद्योगांना देखील मोठा फटका बसला होता. मात्र, आता वाहन कंपन्यांच्या विक्रीत देखील झपाट्याने वा.ढ झालेली पहायला मिळत आहे. गेल्याच महिन्यात भारत देशात वाहन कंपन्यांच्या सरासरी विक्रीत 10 टक्क्यांची वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

सध्या अनेक नवनवीन गाड्या बाजारात येतंच आहेत. पण त्यासोबतच जगभरात अनेक वाहन कंपन्यांची विलिनीकरण देखील चालू आहेत. अशातच आता फ्रान्सची प्युजो आणि इटलीची फियाट या वाहन कंपन्यांचं विलिनीकरण होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

या कंपन्यांच्या विलीनीकरणातून जगातील चौथी मोठी वाहन कंपनी अस्तित्वात येणार आहे. प्युजो व फियाटच्या एकत्रिकारणाला उभय कंपन्यांच्या भागधारकांनी सोमवारी मंजुरी दिली आहे.

येत्या काळात ही कंपनी अनेक हटके गाड्या बाजारात आणणार असल्याचं बोललं जात आहे. वर्षाला 87 लाख वाहननिर्मिती व 5 अब्ज युरोचा समूह याद्वारे आकारास आला आहे. फॉक्सवॅगन, टोयोटा, व रेनो निस्साननंतर आता फियाट व प्युजो कंपनी जगातील चौथी मोठी वाहन कंपनी असेल.

फियाट प्युजो कंपनीचे 11 सदस्यीय संचालक मंडळ असेल. या कंपनीवर पीएसए चे मुख्याधिकारी कालरेस टवर्स यांचे व.र्चस्व असेल. फियाटच्या इतर विद्यमान वरिष्ठ अधिकाऱ्यांना इतर विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, प्युजो फियाटच्या अखत्यारीत असेल. फियाटच्या अखत्यारीत सध्या सिट्रॉनही आहे. सिट्रॉनची एसयूव्ही गटातील नवीन कार चालू वर्षात भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-