राज्यातील ‘या’ चार जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील दोन दिवस पाऊस झोडपून काढणार

मुंबई | हवामान विभागानं वर्तवलेल्या अंजानुसार मुंबईत पावसाला सुरूवात झाली आहे. राज्यात अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. मुंबई, ठाणे आणि रत्निगीरत पावसाच्या सरी कोसळत आहे.

दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झालीय. या सर्वांमुळे पुढील काही तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता आहे. परिणामी पुढील दोन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागानं जारी केलेल्या अ‌ॅलर्ट प्रमाणं मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळी सकाळी पावसानं सुरुवात केल्यानं छत्री आणि कोट शिवाय बाहेर पडलेल्या मुंबईकरांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. तर, पालघरमध्येही पावसाला सुरुवात झाली आहे.

आयएमडीनं पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. पालघरमध्ये पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. पालघर , बोईसर , डहाणू भागात पावसाची संततधार सुरु झालीय. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे.

भारतीय हवामान विभागानं हवामानाचा अंदाज जारी केला असून पालघर, नाशिक, धुळे नंदुरबारला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

1 डिसेंबरला कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाच्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अवकाळी पावसाच्या अंदाजानुसार बुऱ्हाणपूर मध्यप्रदेश क्षेत्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

महत्त्वाच्या बातम्या- 

राष्ट्रवादीचा शिवसेनेला मोठा धक्का; 25 वर्ष आमदार राहिलेला ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर 

Twitterचे नवे सीईओ पराग अग्रवाल यांना आहे इतका पगार; आकडा ऐकून थक्क व्हाल

फक्त ‘या’ एका गोष्टीमुळं पतंगराव वसंतदादांच्या नजरेत भरले!, पुढं आयुष्य बदललं 

‘तुझको मिर्ची लगी तो मै क्या करूँ’; ‘या’ शिवसेना नेत्याचा तटकरेंना टोला

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; एअर इंडियानंतर ‘या’ कंपनीला विकणार