कोरोनाग्रस्ताने लोकांशी संपर्क केल्यास ही शिक्षा; पहा या सरकारचा अजब फतवा

रोम | कोरोना व्हायरसची जगभरात दहशत पसरत आहे. एकीकडे भारतातही कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर इटलीमध्येही कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. मात्र कोरोनाचा सामना करण्यासाठी इटलीने एक अजब फतवा काढला आहे.

कोरोनाव्हायरसची लक्षणे दिसल्यास त्या व्यक्तिला 14 दिवस वेगळे राहावे लागते. संशयित रुग्णाने असे करण्यास नकार दिल्यास त्याला 21 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते, असा इशारा इटलीमधील सरकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

खोकला, ताप किंवा त्वचेचा आजार असल्यास त्यांनी इतरांशी संपर्क टाळावा, अथवा त्यांना खुनाचा प्रयत्न केल्याची शिक्षा होऊ शकते. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी या सरकारने अजब फतवा काढला आहे.

दरम्यान, इटलीमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याने अवघ्या 24 तासांत 1266 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसंच 24 तासांत कोरोनाने बाधित होणाऱ्यांची संख्या 2116वर गेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-कोरोनाच्या संदर्भात अण्णा हजारेंनी पर्यटकाना केलं हे आवाहन…

-बिल गेट्सनी दिला मायक्रोसॉफ्ट संचालक मंडळाचा राजीनामा, आता करणार या क्षेत्रात काम…

-इथून पुढे खासगी बॅंकांमध्ये शासकीय पैसा ठेवणार नाही-महाराष्ट्र शासन

“तुम्ही सेक्युलर असाल तर आंबेडकरांच्या नावाला पाठिंबा द्या”

-सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या मुद्द्यांवरुन उर्जामंत्र्यांनी केलं ब्राह्मण समाजाला लक्ष्य!