Top news

कोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं ‘हे’ गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ

Photo Credit- Twitter/@payalmehta100

काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नाहीय. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

सगळीकडे सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला असल्याचं दिसत आहे. या काळात काही रूग्णांना उपचारही मिळत नाहीयत. त्यामुळे अनेकांना मृत्यू तोंड द्यावे लागत आहे.

तसेच सध्या कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू पावल्यानंतर त्याचे नातेवाईक त्याला श्रद्धांजली वाहतात. या आजारामुळे सगळे सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये आयटीबीपी अधिकाऱ्याने एका कोरोना योद्धाच्या समर्थनार्थ एक गाण वाजवलं आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की, या काळात डॉक्टर, जवान जे आपल्या जीवाची पर्वा न करता देशाची, रूग्णांची सेवा करत आहेत, अशा करोना योद्ध्यांचे विशेष पद्धतीने स्मरण केले आहे.

त्यांनी ‘केसरी’ या हिंदी चित्रपटामधील ‘तेरी मिटी मे मिल जावा ‘ हे गाणं वाजवलं आहे. त्यांचं हे गाणं ऐकून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत.

तसेच हा व्हिडीओ ‘पायल मेहता’ या युजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केल आहे. व्हिडीओ शेअर करताना कोरोना युगात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील 300 पेक्षा अधिक सैनिक मरण पावले असल्याचं त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
त्याचप्रमाणे आतापर्यंत हा व्हिडीओ खूप लोकांनी पाहिला असून, अनेकांनी या व्हिडीओला कमेंटही केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

वऱ्हाड निघालं लग्नाला! जमिनीवर लाॅकडाऊन, जोडप्यानं आकाशात…

चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आईचा फोन परत मिळवण्यासाठी मुलीचे…

बाळाला झोपवण्यासाठी चक्क डॉक्टरांनी गायली अंगाई, पाहा…

बाबांनी बनवला अनोखा मास्क, पाहा व्हायरल व्हिडीओ

IMPIMP