मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर हिंदूत्वाची भूमिका प्रखरतेने मांडली. त्यामुळे आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे.
याच गुडीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मनसैनिकांनी मशिदींसमोर स्पीकरवर हनुमान चालिसा वाजवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अनेक ठिकाणी मशिदींसमोर स्पीकर देखील लावण्यात आले होते.
त्यावरून राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावर भाष्य केलं आहे.
काही लोक समाजात संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम करतात. लोकं जाती धर्मांमध्ये तेठ निर्माण होऊ देत नाही. पण काही पक्षाचे नेते इथं भोंगा लावा. तिथं भोंगा लावा असं सांगतायेत, असं अजित पवार म्हणाले.
अरे भाषण करणं सोपंय रे बाबा, असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. कुणाला तरी बरं वाटण्यासाठी, निवडणुकीवर डोळा ठेवून अशा प्रकारची भाषणं करायची असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
निवडणुकीवर डोळा ठेवून अशा प्रकारची भाषणं करायची हे महाराष्ट्राला परवडणारं नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, शरद पवारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आता राज्यातील समीकरण बदलणार की काय?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
महत्त्वाच्या बातम्या –
अजान, हनुमान चालीसा वादावर अनुराधा पौडवाल यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…
मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
“…म्हणून मी माझ्या प्रभागात हनुमान चालीसाचे भोंगे लावणार नाही”
“…यांना सिंहासनावरून खाली खेचल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही”
मोठी बातमी! कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय