सातारा | सातारा नगरपालिका निवडणुकीवरून (Satara Municipal Election)उदयनराजे भोसले (UdyanRaje Bhosle) आणि शिवेंद्रराजे भोसले (ShivendraRaje Bhosle) एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. नगरपालिका निवडणुक असल्याने जोरदार रणधुमाळी रंगली आहे. दोन्ही राजेंकडून विकासकामांच्या कार्यक्रमामध्ये जोरदार टोलेबाजी रंगलेला पाहायला मिळत आहे. उदयनराजे यांनी केलेल्या ‘काय बाई सांगू कसं बाई सांगू’ यावर आता शिवेंद्रराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शुक्रवारी नगरपालिकेल्या नवीन इमारत भूमीपुजनावेळी उदयनराजे भोसले यांनी काय बाई सांगू? कसं बाई सांगू मलाचं माझी वाटे लाज, असं म्हणत शिवेंद्रराजेंना जोरदार टोला लगावला होता. आम्हा नारळ फोडून लोकांसाठी चांगलं काम करतोय मात्र, तुम्ही लोकांची घरचं फोडण्याचं काम केलं आहे, असंही उदयनराजे म्हणाले होते.
सातारा येथे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्धाटन करण्यात आले. साताऱ्यातील रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार शिवेंद्रराजे भोसले चक्क जेसीबीवर स्वार झाले.त्यांनी जेसेबीचे स्टेरिंग हातात घेत रस्त्याचे भूमिपूजन केले.
सातारा नगर पालिकेच्या नवीन इमारतीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भूमिपूजन केले यावेळी उदयनराजे भावूक होत आय लव सातारकर (I love Satarkar) असे उद्गार काढले होते.यावर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सडकून टीका केली आहे. या इमारतीचा प्रस्ताव नाही, बजेट नसून तांत्रिक मान्यता नसल्याचे सांगत नारळ फोडून गाणी गाऊन लोक मोकळी झाली.
गाणी गाण्यापेक्षा तुम्हाला नक्की लाज कशाची वाटते हे सातारकरांना कळू दे. नेहमी रडायचं आणि पप्पी घ्यायची हे नेहमीचं झालं आहे. 5 वर्ष तुम्हाला सत्ता दिली तुम्ही भ्रष्टाचार मुक्त पालिका करणार होता मात्र हे कुठं गेलं? असा प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला.
उदयनराजेंना उद्देशून शिवेंद्रराजेंनी नारळफोड्या गँग, असंही म्हटलं होतं. सध्या वापरण्यात येणाऱ्या टॅकटीक्स लक्षात घ्या. गळ्यात पडायचं पप्प्या घ्यायच्या हे जे प्रेम आहे ते मनापासून नाही. हे मतांपुरतचं प्रेम आहे. हे सातारकरांनी ओळखलं पाहिजे, असा टोला शिवेंद्रराजेंनी लगावला आहे.
शिवेंद्रराजेंनी जेसीबीचा स्टेअरिंग हातात घेत रस्त्याचं भूमिपुजन केलं. उदयनराजे त्यांच्या स्टाईलने नेहमीच चर्चेत असतात. चाहत्यांच्या आग्रहास्तव शहरातून दुचाकी चालवणे आणि सुसाट जिप्सी राईडचे व्हिडीओ चांगलेचं गाजतात. त्यातच शिवेंद्रराजेंनी जेसीबीचा स्टेअरिंग हातात घेतल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, सातारा नगरपालिकेच्या नविन इमारतीच्या भूमिपुजन सोहळ्यामध्ये उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना चर्चेला येण्याचं आवाहन केलं होतं. यावेळी उदयनराजेंनी आमचा उल्लेख नारळफोडी गँग असा केला जातो. तरीदेखील काम केली असल्याने आम्ही नारळ फोडतोय. काही कारण नसताना लहान मुलांप्रमाणे शिवेंद्रराजेंकडून वैयक्तिक टीका केली जात आहे, असं उदयनराजे यांनी बोलून दाखवलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“अजित पवार यांनी दरडावून नाही तर समजावून सांगावं”
मला तर वाटतं मरावं आणि त्या राणी बागेतल्या…- सुधीर मुनगंटीवार
‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती!
“…त्यात आमचा कार्यकर्ता असेल तर त्यालाही फासावर लटकवून टाका”
‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते’; मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर