ऐकावं तेवढं नवलचं! चाहत्यानं उभारला चक्क ‘या’ अभिनेत्रीचा पुतळा

अभिनेत्री निधी अग्रवाल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. निधीचा अशा कलाकारांच्या यादीमध्ये समावेश झाला आहे. ज्यांची मंदिरे बांधली आहेत. त्यामुळे ही निधी अग्रवाल नेमकी कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. निधी अग्रवालच्या एका चाहत्याने तिला व्हॅलेंटाईन च्या दिवशी खास भेट दिली आहे. त्या चाहत्याने चक्क तिचा पुतळा उभारला आहे. या संदर्भातील माहिती निधीला सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांनी दिली.

निधीने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत वक्तव्य केले आहे. त्यांनी मला सांगितले की व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी माझ्यासाठी ही खास भेट आहे. ते ऐकून मी हैराण झाले. मी असा कधी विचार पण केला नव्हता. पण मी खूप आनंदी आहे आणि ते माझ्यावर इतकं प्रेम करतात त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे, असं निधी म्हणाली.

पुतळा कुठे आहे याबाबत निधीला माहिती नव्हती. तिने हा पुतळा चेन्नईमध्ये असल्याचे म्हटले आहे. मी या इंडस्ट्रीमध्ये नवीन आहे. मी तामिळमध्ये दोन चित्रपट केले आहेत. आणि तेलुगूमध्ये काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. मी सध्या दोन्ही भाषांच्या चित्रपटांसाठी चित्रीकरण करत आहे. त्यामुळे हे माझ्यासाठी थोडे शॉकिंग आहे, असंही निधी म्हणाली.

मला वाटले नव्हते की चाहते असं देखील करतील. यापूर्वी तामिळनाडूमध्ये चाहत्यांनी अनेक कलाकारांची मंदिरे बांधली आहेत. ज्यामध्ये एमजीआर, खुशबू सुंदर, हंसिका मोटवानी आणि नयनतारा अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.

कोण आहे निधी अग्रवाल –

निधीचा जन्म हैदराबाद येथे झाला आहे. निधीने 2017 मध्ये अभिनयाच्या जगतात पाय ठेवला होता. तिने बॉलिवूडमधील ‘मुन्ना माइकल’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्धीकी आणि टायगर श्राॅफ यांच्यासोबत काम केले आहे.

निधीने 2018 आणि 2019 मध्ये काही तेलगू चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ज्यामध्ये ‘सव्यसाची’, ‘मिस्टर मजनू’, ‘आईस्मार्ट शंकर’ या चित्रपटांचा समावेश आहे. आता निधीचे ‘भूमि’ आणि ‘पूनगोडी’ हे तामिळ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच! ‘या’ महिला आरोपीला दिली जाणार फाशी

IPLच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली!!! दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूवर लागली जबरदस्त बोली

IPL 2021 Auction | पंजाबच्या संघाचं नाव बदललं? के.एल.राहूलचा खुलासा म्हणाला…..

FB चा मोठा दणका; ‘या’ देशात फेसबुकने बातम्या पाहण्यास, शेअर करण्यास घातली बंदी !

अबब…सोन्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची घट; वाचा आजचा दर