“नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी जेवढं काम केलंय, तेवढं आजवर कोणीही केलेलं नाही”

नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी जेवढं काम केलं आहे, तेवढं कोणत्याही शेतकरी नेत्याने केलेलं नाही, असं नड्डा म्हणालेत.

गोरखपूर भागातील चंपा देवी पार्क येथील बुथ अध्यक्षांच्या अधिवेशनाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी संबोधित केलं. यावेळी जे पी नड्डा बोलत होते.

अनेक लोक शेतकर्‍यांचे नेते बनतात, पण शेतकर्‍यांसाठी जर कुणी काही केलं असेल तर ते फक्त नरेंद्र मोदी आहेत, असं जे पी नड्डांनी म्हटलंय.

भाजप ‘सबका साथ, सबका विश्वास’ हे ब्रीदवाक्य घेऊन सर्वांना सोबत घेऊन जात असताना, विरोधक मतपेटीचे राजकारण करतात आणि केवळ ‘विशेष समाज आणि कुटुंबाची’ चिंता करतात, असंही नड्डांनी म्हटलं आहे.

आम्ही प्रत्येकाच्या प्रगतीचा विचार करतो आणि ते त्यांच्या भावाचा आणि काकाचा विचार करतात. आता त्यांनी काकांबद्दलही विचार करणे सोडून दिले आहे, असा टोला जे पी नड्डा यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यांना लगावला आहे.

आम्ही सांस्कृतिक राष्ट्रवादासोबत आणि विरोधक वंशवादी राजकारणासोबत पुढे जात आहेत, अशी टीका नड्डांनी यावेळी विरोधकांवर केली आहे.

आमच्यासाठी राष्ट्रवाद महत्त्वाचा आहे आणि त्यांच्यासाठी ‘वंशवाद’ हेच सर्वस्व आहे, अशी टीका नड्डा यांनी केली आहे.

मी नेहमी म्हणतो की, वाटेवर भटकणाऱ्याने थांबू नये, नेहमी चालत रहा. पक्ष मजबूत करणं हाच आमचा उद्देश आहे, असं जे पी नड्डांनी सांगितलं आहे.

भाजपचे हे भव्य कार्यालय पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आहे. मात्र या भव्य इमारतीमागे भाड्याच्या खोलीत 10 वर्षांपूर्वी पक्षाची विचारधारा पुढे नेणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचं योगदान आहे, असंही नड्डांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

“…तर राज्यातील सरकार केंद्राकडे चालवायला द्या”

“आम्ही बाबरी पाडली असं उद्धव ठाकरे सभागृहात सांगतात, तेव्हा राष्ट्रवादीला लाज वाटत नाही का?” 

…म्हणून माझा पराभव झाला, माझा गाफीलपणा मला नडला- शशिकांत शिंदे

‘पदामुळे काही होत नाही…’; पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य 

“मला माफ करा, पवारसाहेब तुमच्यासाठी जीव देईन पण…”