महाराष्ट्र मुंबई

“युतीचा विचार सोडून निवडणुकीच्या तयारीला लागा”

मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी सेना-भाजपमध्ये युती होणार नाही असंच सत्र सुरु होतं. ऐन निवडणुकीच्या तोंडावर युती झाली. विधानसभा निवडणुकीतही आता सेना-भाजप एकत्र लढणार का याबाबत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सल्ला दिला आहे. 

शिवसेनेसोबत विधानसभा निवडणुकीसाठी युती होणार की नाही याचा विचार करत बसू नका. तर आपल्याला सर्व मतदारसंघात काम करायचे आहे. हे लक्षात ठेवा, असा सूचक सल्ला जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहे. 

जे. पी. नड्डा यांचं शनिवारी मुंबईत आगमन झालं. त्यावेळी त्यांनी दादरमध्ये वसंतस्मृती येथे पक्षाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी नेत्यांना, पदाधिकाऱ्यांनी सल्ला दिला.

लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये शैथिल्य येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या जोमाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी पक्षसंघटनेला कार्यरत करा, असं संदेशही त्यांनी दिला आहे. 

प्रत्येक मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख यांना भेटून ते राज्य सरकारची कामे लोकांपर्यंत सरकारी योजनांचे लाभ मिळवून देतील याकडे लक्ष द्या असंही त्यांनी सांगितलं. 

पक्षाच्या सदस्यता नोंदणीचं गांभिर्य लक्षात घ्या. सर्व गोष्टींचा येत्या विधानसभा निवडणुकीत उपयोग होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक रविवारी (आज) गोरेगाव येथिल नेस्को संकूल येथे होणार आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-डिस्चार्ज दिलेल्या रूग्णाच्या पायात 2 इंचाची काच; मनसेने उघडकीस आणला हॉस्पिटलचा प्रताप

“काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात; लवकरच पक्षात प्रवेश करतील”

“अजित पवार यांना माझं कालही आव्हान होतं… आजही आहे… अन् उद्याही राहणार”

अजित पवार घरभेदी; स्वतःच्या दिवट्यासाठी पवार साहेबांनाही अव्हेरलं!

-भाषणादरम्यान शेतकरी ओरडला गावात दवाखाना नाही; लगोलग आदित्य ठाकरे म्हणाले…

IMPIMP