जब्याच्या शालूनं लावली सोशल मीडियावर आग; ‘या’ गाण्यावरील अदा पाहून चाहते घायाळ!

मुंबई |   नागराज मंजुळे निर्मित यांचा ‘फँन्ड्री’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता, या चित्रपटाला काही पुरस्कार सुद्धा मिळाले होते. या चित्रपटात अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने शालूची भुमिका साखारली होती. हा चित्रपट जातीवर आधारीत असून त्यांच्यातील प्रेम कहाणी यात दाखवण्यात आली आहे.

जेव्हा फँड्री या चित्रपटाचे काम चालू केलं, तेव्हा शालू म्हणजेच राजश्री खारट नववीत होती. तिने आपले शिक्षण जोग युनिव्हर्सिटी पुणे येतून पूर्ण केले आहे आणि सिंहगड कॉलेज मधून तिने B. COM केलं आहे. फँड्री या चित्रपटात विषेश म्हणजे तिचा एकही डायलॉग नाही. तरीसुद्धा तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे.

राजश्री खारट सध्या सोशल मिडीयावर चांगलीच असते. सध्या तिचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राजश्री नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. तसेच ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राजश्री खारट एका हिंदी गाण्यावर डान्स करता दिसत आहे. तिच्या या डान्समुळे चाहते घायाळ झाले आहेत.

राजश्रीने त्या व्हिडीओमध्ये आपला बोल्ड अंदाज दाखवल आहे. त्याचबरोबर तिने हा व्हिडीओ आपल्या फेसबुक आकाऊंटवरुन शेअर केल्याचं दिसतं आहे. तसेच तिने व्हिडीओ शेअर करताना ‘डोन्ट जज’ असं कॅप्शन लिहिलं आहे.

राजश्री खारटने यापूर्वी एक गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. तोही व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओबरोबर राजश्री खारटने साडी घातलेले फोटो देखील सोशल मिडीयावर पोस्ट केले होते.

दरम्यान, राजश्री खारटला फॅन्ड्री या चित्रपटानंतर खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर राजश्रीला ‘अटमगिरी’ हा चित्रपट मिळाला होता. याही चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. मात्र हा चित्रपट जास्त यश प्राप्त करु शकला नाही.

महत्वाच्या बातम्या-