मुंबई | राज ठाकरे (Raj Thackeray) हे माझे फार पूर्वीपासूनचे मित्र आहेत. त्यांनी मला फार आधी एक गोष्ट सांगितली होती. जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर तुम्हाला मराठीत बोलता आलं पाहिजे. मला स्पष्ट मराठी बोलता येत नाही पण मी प्रयत्न करतो, असं अभिनेता जॅकी श्रॉफ म्हणाले.
प्रोफेसर संजय बोराडे यांच्या जनरेशन XL या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), अभिनेता जॅकी श्रॉफ हे उपस्थितीत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
माझा मित्र आता आजोबा झाला आहे. तुम्ही सुरकुत्या असलेले लोक आजोबा झालेले पाहिले असतील पण राज ठाकरे हे ट्रेंड चेंजर आहे. ते खूपच तरुण दिसतात, असंही जॅकी श्रॉफ म्हणाले.
डॉक्टर हे देवासारखे असतात. ते लहान मुलांना फार प्रेमाने सांभाळतात. आपण आपल्या मुलांच्या आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं,
आपण मुलांना जे खायला देतो, त्याचे अप्रत्यक्षरित्या परिणाम हे त्यांच्या शरीरावर होत असतात. त्यामुळे मुलांना फ्राईड फूड देणं शक्यतो टाळलं पाहिजे. तसेच त्यांच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेतली पाहिजे, असं जॅकी श्रॉफ म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी समोर; शिवसेनेचं निमंत्रण फेटाळत संभाजीराजे कोल्हापूरला रवाना
“पक्षात 12 वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली?, लाथ मारा त्या खासदारकीला”
“वसंत भाऊ तुझी राजसाहेबांना सांगण्याची कधी हिम्मत झाली नाही, आता…”
केंद्र सरकार पाठोपाठ ठाकरे सरकारनेही घेतला मोठा निर्णय!
‘तू कोण आहेस, गांधी की वल्लभभाई?’; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका