मुंबई | ममता बॅनर्जी यांनी मला विधानसभेत जाण्यापासून रोखलं, असा खळबळजनक आरोप राज्यपाल जगदीप धनखर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर केला आहे.
आपण सूचना देऊनही विधानसभेचे तीन नंबरचं गेट बंद का ठेवण्यात आलं. सभागृहाचे कामकाज स्थगित असेल म्हणजे त्याचा अर्थ गेट बंद असावा असा होत नाही. राज्यपालांच्या प्रवेशासाठी असलेलं प्रवेशद्वार बंद असणं ही लोकहशाहीच्या इतिहासातील अपमानास्पद घटना आहे, असं राज्यपालांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आपल्यावर असभ्य भाषेत टीका केली आहे. तसेच संविधान दिनाच्या कार्यक्रमानंतर बोलताना ममता बॅनर्जी यांनी माझ्यासाठी तू चीज बडी है मस्त मस्त, असे शब्द वापरल्याचा आरोपही राज्यपाल जगदीप धनखर यांनी केला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखर यांच्यात अधिकारांवरून चांगलीच जुंपली आहे.
महत्वाच्या बातम्या-
अन् म्हणे भाजपचे डझनभर आमदार फुटणार- आशिष शेलार – https://t.co/0vWhZxkjkm @ShelarAshish @BJP4Maharashtra @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019
“स्वत:चा आत्मसन्मान जपा अन् अन्याय होतोय तर बाहेर पडा” – https://t.co/5hCBYgcnjQ @BJP4Maharashtra @AnilGoteOffice @Pankajamunde @EknathKhadseBJP
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019
जेलमधून बाहेर येताच पी. चिदंबरम यांचा सरकारवर बरसले! – https://t.co/bhrvZFWgBE @PChidambaram_IN @INCIndia @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019