देवेंद्र फडणवीसांनी दिली जगदीश मुळीक यांच्याकडे पुणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी

पुणे | पुणे शहर भाजपच्या अध्यक्षपदी जगदीश मुळीक यांची निवड करण्यात आली आहे. बाळा भेगडे यांनी ही घोषणा केली. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खास माणूस पुणे शहराध्यक्ष झाल्याचं चित्र आहे.

बुधवारी पुणे शहर संघटन कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप नेते बाळा भेगडे यांनी जगदीश मुळीक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे मुळीक यांच्याकडे आता पुणे शहराची जबाबदारी असणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, राज्यसभेचे खासदार संजय काकडे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेता धीरज घाटे इत्यादी नेते यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, जगदीश मुळीक हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांची शहराध्यक्ष पदी निवड झाल्याचं बोललं जातंय.

महत्वाच्या बातम्या-

-“मोदी-शहा खुनी असल्याचे माझ्याकडे पुरावे”

-“भष्ट्राचाराच्या पैशातून मुनगंटीवारांनी 500 कोटी रुपयांचा बंगला बांधला”

-जेव्हा नारायण मूर्ती रतन टाटांच्या पाया पडतात

24व्या आठवड्यातही गर्भपात करता येणार; मोदी सरकारचा मो़ठा निर्णय

-सीएएविरोधात प्रस्ताव आणण्याचा कोणताही विचार नाही- अजित पवार