जळगाव | भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीच्या बैठकीतच भाजप खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांच्या दोन गटात जोरदार राडा झाला. या बैठकीला रावसाहेब दानवे आणि राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते. मात्र भाजप नेेतेे एकनाथ खडसेच बैठकीला नव्हते.
भाजपचे दिवंगत जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या समर्थकांनी भाजपचेच माजी आमदार बी एस पाटील यांना मंचावरच मारहाण केली होती. खानदेशात खडसे समर्थक आणि महाजन समर्थक असे दोन गट पडले आहेत.
भुसावळ येथील दोन गटांमध्ये शाब्दिक वाद झाल्याने कार्यकर्ते आपआपसात भिडले. या गोंधळातच काही अज्ञात कार्यकर्त्यांनी थेट सुनील नेवे यांच्यासह रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांच्या दिशेने शाई फेकण्याचा प्रयत्न झाल्याचीही माहिती समजत आहे.
दरम्यान, या गोंधळात भाजपमधील एका पदाधिकाऱ्याच्या अंगावर कार्यकर्ते धावून गेले. या गोंधळामुळे बैठकीच्या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला. सुनील नेवे हे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे समर्थक समजले जातात.
महत्वाच्या बातम्या-
आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नीच्या हस्ते पार पडणार श्रीशिवशंभू राज्याभिषेक – https://t.co/VvVl9RaYlG @YuvrajSambhaji
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020
भाई, जाट हूॅं अंधभक्त नहीं; ट्रोल करणाऱ्याला विजेंदर कुमारचा पंच! – https://t.co/CiQm2PK7UM @boxervijender
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य! – https://t.co/zeHuKlIIh0 @NANA_PATOLE @BJP4India @BJP4Maharashtra @INCIndia
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020