मुंबई | औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामकरणास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयावरुन एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीये. त्यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.
आजचा निर्णय अतिशय घाणेरड्या राजकारणासाठी घेण्यात आला आहे. आता शहरातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या फोटोवर चपलांचा हार घातला पाहिजे. राजकारणासाठी हे नेते अतिशय खालच्या पातळीवर आलं, असं त्यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे आमच्या मनात तुमच्याबद्दल आदर होता, पण जायची वेळ आली तर नीट जायचं ना, असं घाणेरडं राजकारण करण्याची गरज नव्हती, असं जलील म्हणालेत.
आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे दलाल नेते रस्त्यावर फिरताना दिसले, तर त्यांच्या अंगावर थुंका. यांनी अतिशय खालच्या पातळीचे राजकारण केले. सत्तेचा इतकाच मोह होता, तर सत्तेला चिटकून बसायला हवं होतं. आम्ही चपला मारू अशा नेत्यांना, अशी टीका त्यांनी केली आहे.
मला शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी, अशोक चव्हाण आणि मराठवाड्यातल्या सर्व नेत्यांना विचारायचंय, हा निर्णय घेतला जात होता, तेव्हा तोंडात लाडू टाकून बसला होतात का?, असा सवाल त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आता महाराष्ट्रात येणारं भाजप सरकार पुढील 25 वर्षे चालेल- देवेंद्र फडणवीस
शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता जाणार शिंदे गटात
उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, महाविकास आघाडी सरकार कोसळलं
सर्वोच्च न्यायालयाचा महाविकास आघाडीला झटका, उद्या बहुमताची चाचणी होणार
मोठी बातमी! औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर होणार, कॅबिनेट बैठकीत 3 महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर