नवी दिल्ली : जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर झाले. त्यानंतर हे विधेयक मंगळवारी लोकसभेतही मंजूर झाले आहे.
लोकसभेत 367 विरुद्ध 67 मतांनी हे विधेयक मंजूर झाले आहे. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 मधील काही तरतूदी रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी घेतला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी हे विधेयक राज्यसभेत मांडले होते. त्यानंतर मंगळवारी लोकसभेतही त्यांनीच हे विधेयक मांडले. या विधेयकाला लोकसभेतही मंजूरी मिळाली आहे.
काश्मीर हा भारताचाच अविभाज्य घटक आहे. काश्मीरसाठी संसद सर्वोच्च राहील, असं अमित शहा लोकसभेत म्हणाले होते.
काश्मीरबाबत नवे कायदे करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असंही शहांनी सांगितलं होते. मोदी सरकारच्या या निर्णयाला अनेकांनी विरोध दर्शवला आहे.
Resolution revoking Article 370 from Jammu & Kashmir passed in Lok Sabha pic.twitter.com/BhDpDJV0Bs
— ANI (@ANI) August 6, 2019
महत्वाच्या बातम्या-
-“भाजपने स्वत:च्या आनंदासाठी घटनात्मक वचनाचा घात केला”
-“‘नाच्या’चं काम तुमचं नाही, तुम्ही पाण्याचं बघा”
-“भाजपची महाजनादेश यात्रा ही ‘चालू’ मुख्यमंत्र्यांची ‘चालू’ यात्रा”
-काश्मीरबाबत बेजबाबदार वक्तव्य; गौतमने केली शाहीदची कानउघडणी
-भाऊ कदम आता नव्या रंगात अन् नव्या ढंगात येणार तुमच्या समोर!