मुंबई | कोरोना काळात आरोग्य व्यवस्थेला मोठा फटका बसला. आरोग्य विभागावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. त्यामुळे राज्य सरकारला काही काळ आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं.
कोरोना काळात ठाकरे सरकारच्या 18 मंत्र्यांच्या कोरोनावरील उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करून सरकारी तिजोरीचा पैसा वापरल्याची माहिती समोर आली होती.
या सर्व प्रकरणात 1 कोटी 40 लाख रूपयांचा वापर केल्याची माहिती समोर आली होती. त्यात खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर 34 लाख 40 खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण तापल्याचं पहायला मिळत आहे.
सध्या हे प्रकरण विरोधी पक्ष भाजपने डोक्यावर घेतलं आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
जनतेला सरकारी हॉस्पिटलसाठीही रखडावं लागत होतं त्या कोरोना काळात काळात मंत्री जनतेचा पैसा वापरून पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, असं भातखळकर म्हणाले आहेत.
सरकारकडे फक्त मंत्र्यांवर उधळण्यासाठी पैसे आहेत. जनता उपाशी आणि मंत्री तूपाशी! हीच का तुमची शिवशाही?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून गदारोळ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार या प्रकरणावर काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ईडीचा नवाब मलिकांना झटका, आता…
“केंद्र सरकारनं अख्खा देश उद्योगपतींना विकला”
‘पाच कोटी द्या, अन्यथा…’; धनंजय मुंडेंना महिलेची धमकी
“देशाच्या संविधानावर बुलडोजर चालवला जातोय”