मुंबई | महाराष्ट्रातील जनतेच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारनं जनता कर्फ्यू वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याची माहिती दिली.
आज पाळण्यात येत असलेला जनता कर्फ्यू उद्या सकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. त्यानंतर 31 मार्चपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात येईल. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली.
आजच्या जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर दोन आदेश काढण्यात येणार आहेत. यामध्ये पहिल्या आदेशात आजच्या जनता कर्फ्यूचा कालावधी उद्या पहाटे 5 वाजण्यापर्यंत वाढवण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या आदेशात आजच्या जनता कर्फ्यूचा कालावधी उद्या पहाटे 5 वाजण्यापर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 31 तारखेपर्यंत दुसरा जमावबंदी आदेश काढण्यात येणार आहे.
दरम्यान, उद्या पहाटे पाच वाजल्यापासून 31 तारखेपर्यंत 5 पेक्षा जास्त लोकांनी एका जागी एकत्र जमू नये. या आदेशातून काही संस्था वगळण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
-VVIP उपचारांसाठी कनिका कपूर घालतेय डाॅक्टरांशी हुज्जत
-देशात ‘कोरोना’चा सहावा बळी; पाटणामध्ये एकाचा मृत्यू
-जनता कर्फ्यूच्या दिवशी राजू शेट्टींनी काय केल? पहा व्हिडीओ
-“संपूर्ण बॉलिवूडने कनिका कपूरवर बहिष्कार टाकावा”