गेल्या काही दिवसांपासून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच बोहऱ्यावर चढणार असल्याच्या चर्चांना उधान आलेलं होतं. बुमराह स्पोर्ट्स प्रेझेंटेटर संजना गणेशन हिच्याशी लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा होती. आज अखेर जसप्रीतने सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
आज अखेर त्यांनी गुरुद्वाऱ्यामध्ये पंजाबी पद्धतीने बुमराह आणि संजनाचा विवाह सोहळा पार पाडला. बुमराह आणि संजनाने त्यांचे नातेवाईक आणि जवळचे मित्र यांच्यासह खासगी कार्यक्रमात लग्न केले.
जसप्रीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने “आम्ही आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आजचा दिवस हा आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवसांपैकी एक आहे. आम्ही लग्न केले हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे” या आशयाचे कॅप्शन त्याने दिले आहे.
बुमराह सोबतच संजनानेसुद्धा इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांना देत म्हटलं आहे. आम्ही एकमेकांच्या प्रेमापासून प्रेरित होऊन आमच्या आयुष्यातील या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. आणि याबद्दल सर्वांना कळवताना खूप आनंद होत आहे.
दरम्यान, संजना मुळची पुण्याची असून सिंबायोसिस इंन्सिट्यूड मधून तिनं B.TECH चे शिक्षण पूर्ण केलं. त्यात तिने गोल्ड मेडल देखील पटकावलं. त्यानंतर 2013-14 सॉफ्टवेअर इंजिनयरिंग केले. नंतर मॉडलिंग क्षेञात वळाली. संजनाने आत्तापर्यंत क्रिकेट संबंधित अनेक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले आहेत. या पूर्वी बऱ्याचदा क्रिकेट संबंधित कार्यक्रमांमध्ये त्या दोघांची सोबत भेट झाली.
बॉलिवूड सेलेब्रेटींप्रमाणेच क्रिकेटर्सचा विवाहसोहळा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. बुमराहच्या बाबतीतही हेच घडत आहे.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या –
कोरोना नियमांचं उल्लंघन करणं पडलं महागात, ‘या’ अभिनेत्रीवर झाला गुन्हा दाखल
ठाण्यात मेन रोडवर कार झाडाला धडकून जागेवर पलटली अन् मग…; पाहा व्हिडीओ
राज्यातील लॉकडाऊन संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती
ताजमहालचं नाव आता राम महल होणार? भाजप नेत्याचा मोठा दावा