किंग्सटन : भारत विरुद्ध वेस्टइंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने हॅटट्रिक घेतली आहे. जसप्रीतने हॅटट्रिक घेत आपल्या नावावर एक नवा विक्रम नोंद केला आहे. कसोटी सामन्यात हॅट्रीक घेणारा जसप्रित हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
बुमराहने नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूत डेरेन ब्राव्होला झेलबाद केलं. यानंतर तिसऱ्या चेंडूत शामराह ब्रुक्सला शून्य धावांवर माघारी धाडलं. तर चौथ्या चेंडूत रोस्टन चेजलाही बाद करत बुमराहने हॅट्रिक केली.
बुमराहनं वेस्टइंडीजच्या फलंदांजांची झोप उडवली. त्यानं त्याच्या चौथ्या षटकांत सलग 3 गडी बाद करून कारकिर्दीतील पहिली हॅट्रिक केली. बुमराहनं 9.1 षटकात 16 धावा देत विंडीजचे 6 विकेट घेतले आहेत.
बुमराहच्या क्रिकेट करिअरमधील ही त्याची पहिली हॅट्रिक आहे. यापूर्वी क्रिकेटपटू इरफान पठाण याने 2006 मध्ये आणि हरभजन सिंह यांने 2001 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेतली होती.
भारताचा पहिला डाव 416 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून हनुमा विहारीने उत्कृष्ट खेळी करत 111 धावसंख्या केली आहे. तर दुसऱ्या दिवसाअखेर वेस्टइंडीजने 7 गडी गमावत 87 धावां केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतरही गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब! – https://t.co/80ndoVCFby @supriya_sule @NaikSpeaks @NCPspeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 1, 2019
राणा जगजितसिंह यांच्या पक्षांतरावर ओमराजे म्हणातात… –https://t.co/QDgOBJ8DQz @ShivsenaComms @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 1, 2019
ऋषभ पंतमध्ये धोनीसारखा दम नाही; माजी क्रिकेटपटूचं खळबळजनक वक्तव्य! – https://t.co/TlhUwjqFi4 @RishabhPant17 @SGanguly99
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 1, 2019