“हा पुरूषार्थ आहे का?”; हिजाब प्रकरणावर जावेद अख्तर यांची संतप्त प्रतिक्रिया

नवी दिल्ली | देश स्वातंत्र्य होण्यापूर्वीपासून ते आत्तापर्यंत देशात धार्मिक उन्माद अनेकदा उफाळून आला आहे. भारत हा विविध धर्मांचा आणि जातींचा मिळून बनलेला एकसंध देश आहे. या प्रतिमेला काही घटनांनी धक्का पोहोचतो.

सध्या कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरण प्रचंड गाजत आहे. मुस्लीम मुलींना शाळेत हिजाब घालून येण्यास बंदी घातल्यानं देशभर एक प्रकारचा तणाव निर्माण झाला आहे. विविध माध्यामातून प्रशासन शांतता राखण्याचं आवाहन करत आहे.

कर्नाटक सरकारनं हे प्रकरण सध्या न्यायालयात असल्यानं पोलीस प्रशासन आणि महाविद्यालय प्रशासन यांच्या मदतीनं शक्य तितकी शांतता राखण्याच आवाहन केलं आहे. तरीही काही ठिकाणी गोंधळ उडत आहे.

विविध क्षेत्रातील मान्यवर आपापल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे हिजाब प्रकरणावर बोलत आहेत. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून हिजाब प्रकरणावर भाष्य केलं आहे.

मी आजपर्यंत कधीच हिजाब किंवा बुरखा याविषयी बाजू घेतली नाही. मी आजही त्यावर ठाम आहे. जावेद अख्तर यांनी स्पष्ट शब्दात जे घडतंय त्यावर आपली भूमिका मांडली आहे.

मुलींच्या एका छोट्या गटाला घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांच्या टोळीचा मी निषेध करतो. हा पुरूषार्थ आहे का?, हे खेदजनक आहे, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. परिणामी सध्या अख्तर यांच्या वक्तव्यांची चर्चा आहे.

बाॅलिवूडमधील अनेक कलाकारांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. सर्वांचं लक्ष आता न्यायालय या प्रकरणात काय निकाल देणार याकडं लागलं आहे. देशभरात धार्मिक दंगली घडू नयेत म्हणून प्रशासन काम करत आहे.

दरम्यान, शैक्षणिक संस्थामधील हिजाब प्रकरणानं सध्या देशातील अन्य राज्यातही महाविद्यालयांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं प्रत्येक राज्यात गृह खातं तयारी करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 मनसेचं ठरलंय! “आम्ही किंग मेकर नाही तर किंग बनणार”

“कोरोनाला हलक्यात घेऊ नका, कारण…”; भारतीयांना अत्यंत धक्कादायक इशारा जारी

कर्नाटक हिजाब प्रकरणावर हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या… 

रानू मंडल पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात, यावेळी केलं ‘हे’ मजेशीर काम 

Hyundai नं आणली सर्वात स्वस्त कार, टाटाच्या या कारचं मार्केट डाऊन होणार?