विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर जय पवार म्हणतात…

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुलांना राजकारणात न येता शेती किंवा उद्योग व्यवसाय करण्याचा सल्ला दिला होता. अजित पवारांचा हा सल्ला त्यांचा लहान मुलगा जय पवारने चांगलाच मनावर घेतल्याचं दिसत आहे.

मी राजकारणात आलो तरी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा जय पवारने मराठी वाहिनीशी संवाद साधताना केली आहे. 

आपण राजकारणात आलो तरी कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं. तीन चार वर्षापासून माझ्या राजकारणाच्या प्रवेशाची चर्चा सुरु आहे. जरी मी राजकारणात उतरलो तरी मी पक्षाचं कोणतं तरी पद घेऊन, सामान्य माणसांसाठी काम करेन, पण मी कोणतीही निवडणूक लढणार नाही, असं जय पवारने सांगितलं आहे. 

पवार कुटुंबियांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. शरद पवार यांना नाहक गोवलं जातंय. पवारांना राजकीय महत्व असल्यानं सत्ताधारी खेळी करत असल्याचा आरोप, जय पवारांनी केला आहे. 

जय पवार सध्या बारामतीत प्रचारात व्यस्त आहे. वडील अजित पवार यांच्या प्रचाराची धुरा जय पवार सांभाळत आहे. जय पवारच्या उपस्थितीत बारामती शहरात काल पदयात्रा काढून अजित पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. 

महत्वाच्या बातम्या-