‘फक्त 11 लाखांसाठी का छळ चालवलाय?’, राऊतांवरील कारवाईवर जया बच्चन संतापल्या

नवी दिल्ली | गोरेगाव येखील पत्राचाळ भूखंड गैरव्यवहार प्रकरणांच्या आरोपाखाली शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED)अटक केली आहे.

त्यांना विशेष सत्र न्यायालयाने 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेवर आणि कारवाईवर शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेना त्यांच्या पाठिशी ठामपणे उभी असल्याचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितलं.

आता त्यांच्या अटकेवर समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bacchan) यांनी संताप व्यक्त करत भाष्य केले आहे. केवळ 11 लाख रुपयांसाठी का त्रास दिला जातोय?, असा प्रश्न जया बच्चन यांनी विचारला आहे.

भाजपचा हा त्रास फक्त 2024 पर्यंत सुरु राहिल. या सर्वांमागे भाजपच असल्याचे बच्चन यांनी सांगितले. जया बच्चन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्या राऊतांच्या अटकेवर भाष्य करत आहेत.

सक्तवसुली संचलनालयाच्या (Enforcement Directorate) कार्यप्रणालीवर यावेळी प्रश्न उपस्थित केला पाहिजे. ईडीचा आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. 11 लाख रुपयांसाठी तुम्ही कोणाला तरी त्रास देत आहात, असे बच्चन म्हणाल्या.

जया बच्चन यांच्यासोबत बॉलिवूडमधील इतर दिग्गजांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. दिग्दर्शक अशोक पंडित (Ashok Pandit) आणि अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sharlin Chopra) यांनीही संजय राऊतांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

शर्लिन चोप्रा यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मोदी हे संपूर्ण भाजप पक्षाचे श्रीकृष्ण आहेत. सुदर्शन चक्र सुटले आहे, असे शार्लिन आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या. त्यांनी यावेळी संजय राऊतांचा एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हातात देश दिलाय’, अभिनेता सुबोध भावेचं मोठं वक्तव्य

‘शरद पवारांचा खाकस्पर्श’, भाजप नेत्याच्या ट्विटने चर्चांना उधाण

मोठी बातमी! संजय राऊतांच्या ईडी कोठडीत वाढ

‘चाळीसच्या चाळीस आमदारांनी राजीनामा द्या, मग बघू…’, आदित्य ठाकरेंचं बंडखोर आमदारांना आव्हान

फक्त पत्राचाळच नाही तर ‘या’ घोटाळ्यातही संजय राऊतांचं नाव, ईडीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर