मुंगेरीलाल के सपने कभी पुरे नही होंगे; जयंत पाटलांचा मुनगंटीवारांना टोला

मुंबई| शिवसेना-भाजपची युती ही विचारधारेवर आधारित होती. त्यामुळे उद्या मुस्लिम आरक्षणावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दबावाचं राजकारण केल्यास शिवसेनेने काळजी करू नये. या दोन पक्षांनी साथ सोडल्यास भाजप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साथ देईल, असे विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते.

याचाच धागा पकडत राज्याचे जलसंधारण मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलांनी मुनगंटीवार यांना लक्ष्य केलं आहे.  ‘मुंगेरीलाल के सपने’ आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत. सुधीर मुनगंटीवार यांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असे म्हणत जयंत पाटील यांनी टोला लगावला. याबाबत ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, अर्थमंत्री असताना त्यांनी पाच वर्षे महाराष्ट्रातील जनतेला नुसती स्वप्नेच दिली. त्यातलं एकही स्वप्न पूर्ण झालं नाही. आता ते विरोधी पक्षात आहेत आण रोज उद्या आमचं सरकार येणार, अशा स्वप्नात ते वावरत आहेत. पण त्यांचं हे स्वप्नही अधुरंच राहणार आहे,’ असे प्रतिपादन त्यांनी केले.

‘संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूदच नाही. जर मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण मिळत असेल तर ख्रिश्चन आणि शिखांनी तरी काय गुन्हा केला? त्यांनाही धर्माच्या आधारे आरक्षण का दिलं जात नाही? असा सवालही मुनगंटीवार यांनी केला होता. केंद्राने आर्थिक दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षण दिलं आहे. त्यात मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चनांचाही समावेश असल्याचं मुनगंटीवार यांनी निदर्शनास आणून दिलं.

महत्वाच्या बातम्या-

-उद्धव ठाकरेंनी अयोध्येला न येता मक्केला जावं; अयोध्येतील साधूंची टीका

-इटलीहून परतलेल्या राहूल गांधींनी कोरोना चाचणी केली का?; भाजप नेत्याचा सवाल

-“ठाकरे सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवायच राष्ट्रवादी निर्णय घेते?”

-केवळ मला कळावा म्हणून ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे पुस्तक देवेंद्रजींनी लिहिलंय- उद्धव ठाकरे

-सोलापूरच्या खासदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश!; खासदारकी जाणार?