“भाजपची एकट्याची डाळ शिजत नाही, म्हणून मनसे त्यांची बी टीम बनलीये”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून राज्यात जातीवाद फोफावल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय. इतकंच नाही तर शरद पवारांनाच ते हवं होतं, असा घणाघातही राज यांनी केलाय. राज ठाकरे यांच्या या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील यांनी यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मनसे ही भाजपची बी टीम बनली असल्याचा पलटवार केला आहे.

मी अजून त्यांचं भाषण पाहिलं नाही आणि आता पाहणारही नाही. पण भाजपने अशा बऱ्याच बी टीम बाळगायला सुरुवात केलीय. कारण भाजपची एकट्याची डाळ शिजत नाही. मग त्यात एमआयएम आहे, राज ठाकरेंचा मनसे आहे, अजून आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केलीये.

मतं खाणे आणि आपलं राजकारणातलं अस्तित्व टिकवणं हाच एक ऑप्शन राहिला आहे त्यांच्यापुढे. त्यामुळे हे चालू राहील’, अशा शब्दात जयंत पाटील यांनी मनसे आणि भाजपवर पलटवार केला आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनीही राज ठाकरे यांच्या भाषणाचा खरपूस समाचार घेतला आहे. राज ठाकरे हे महाराष्ट्रातील असे एकच नेते आहेत, की जे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात, असा घणाघात राज ठाकरेंनी केलाय.

राज भाषणाला इतक्या गांभीर्याने घेण्याची गरज नाही. लोक सुट्टी असली की एखादा छान बोलणार वक्ता असला की जातात भाषणाला हा इतिहास आहे महाराष्ट्राचा, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंवर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“राज ठाकरे यांच्या इतका सरडा पण रंग बदलत नाही” 

Corona: राज्याच्या कोरोना आकडेवारीत मोठी घट, वाचा आजची ताजी आकडेवारी 

पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना; साडेदहा वर्षात पैसे दुप्पट

 शिवसेना भवन परिसरात मनसेची बॅनरबाजी, हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून डिवचलं

 काळजी घ्या! यंदाचा मार्च महिना ठरलाय सर्वाधिक उष्ण; तब्बल 122 वर्ष जुना ‘हा’ रेकाॅर्ड मोडला