मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे येथील ‘उत्तर’सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली. या टीकेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
वारसा प्रबोधनकार ठाकरे यांचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसे याची, अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी राज ठाकरेंवर केली आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना विरोध आणि आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर, असा टोला जयंत पाटलांनी राज यांना लगावला आहे.
पुतण्या बाळासाहेब ठाकरेंचा मात्र, नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी! वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत, अशी खरमरीत टीकाही जयंत पाटील यांनी केली. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय.
जयंत पाटील यांचा उल्लेख जंत पाटील असा करत राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली होती. या टिकेचा उल्लेख करणाऱ्या राज ठाकरेंना जयंत पाटील यांनी व्हायरस असं म्हटलं आहे.
ट्विटच्या शेवटच्या ओळीमध्ये जयंत पाटलांनी, वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत, असं म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
“शरद पवार संजय राऊतांना कुठे लटकवतील ना, कळणार सुद्धा नाही”
पुणेकरांना झटका, सीएनजीच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ
मोठी बातमी! मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका
राज ठाकरेंच्या सभेसाठी आलेला ‘हनुमान’ पोलिसांच्या ताब्यात; झालं असं की…
‘ये शेपटं धरतो, गरगर फिरवतो फेकून देतो’; राज ठाकरे आव्हाडांवर बरसले