कॅगचा अहवाल आला अन् भाजपच्या फसव्या राष्ट्रभक्तीचा बुरखा फाटला; जयंत पाटलांची टीका

मुंबई |  सियाचीन या युद्धभूमीवर देशाच्या संरक्षणासाठी तैनात असणाऱ्या जवानांना आवश्यकतेनुसार जेवण मिळत नसल्याचं कॅगच्या अहवालात उघड झालं आहे. या कॅगच्या अहवालानंतर आता राजकीय वादाला सुरूवात झाली आहे. कॅगच्या अहवालाने भाजपच्या फसव्या राष्ट्रभक्तीचा बुरखा फाटला, अशी तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

सियाचीन येथे देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना कपडे, अन्न व अन्य साहित्य पुरवले गेले नाही. केंद्र सरकारचा सैन्यांच्याप्रति अक्षम्य दुर्लक्षपणा यातून दिसून येतो, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

देशभक्तीच्या बाता करून भाजपचे लोक देशातील जनतेची फसवणूक करत आहेत. खरंतर कॅगने भाजपच्या खोट्या राष्ट्रभक्तीचा बुरखा फाडलाय, असं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, कॅगने सादर केलेल्या अहवालाने अनेक गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत. सीमेवर तैनात असलेल्या जवानांना योग्य कॅलरीचं जेवण मिळत नाही. तसंच तिथं राहण्यासाठी आवश्यक असलेले कपडेही पुरवले जात नसल्याचं समोर आलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याची प्रतिमा खराब केली आहे; भाजपची टीका

-एक दिवस ओवैसी देखील हनुमान चालिसा म्हणताना दिसतील- योगी आदित्यनाथ

-उद्धवजी, काय तो निर्णय घेऊनच टाका… मी तुमच्या सोबत आहे; नितेश राणेंचं ट्वीट

-आमचा आवाज दाबणं इतकं सोप का आहे?; झायरा वसीमचा मोदींना सवाल

-उद्धवजी, पीडितेचा जीव वाचवा… तिच्यावर चांगल्या रूग्णालयात उपचार करा- चित्रा वाघ