त्यांना दिलासा देण्यासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील राहील; जयंत पाटलांचा शब्द

मुंबई | छोट्या गुन्ह्यांमध्ये कोणी विनाकारण अडकलं असेल तर त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करेल, असं राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. भिमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.

आंदोलनातील छोटे गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात. परंतु जे गुन्हे गंभीर आहेत ते गुन्हे मागे घेण्याबाबतीत गांभीर्याने विचार करावा लागेल. विनाकारण कोणी खोट्या गुन्ह्यात अडकले जाऊ नये, ही भूमिका सरकारची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतीत निर्णय घेतील, असंही पाटील म्हणाले.

मी कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. ज्यांनी जाणीवपूर्वक काही घटना घडवून आणल्या असतील. त्यांना दिलासा दिला जाणार नाही, असं जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. कोरेगाव भीमा प्रकरणात जयंत पाटील संभाजी भिडेंना सहानुभूती दाखवत असल्याचा आरोपावर त्यांनी भाष्य केलं आहे.

कोणाला दिलासा द्यायचा आणि कोणाला शिक्षा द्यायची याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोतोपरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आहे याबाबत निर्णय घ्यायला मी गृहमंत्री नाही, असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-