मुंबई | विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभेत जयंत पाटील यांनी आपल्या भाषणादरम्यान तुफान फटकेबाजी केली आहे. मी पुन्हा येईन या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्यावर, ते पुन्हा आले खरे पण विरोधी पक्षनेता म्हणून… अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे.
विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा ठराव विधानसभेत मांडण्यात आला. यावेळी जयंत पाटील यांनी अतिशय खुमासदार शैलीत भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणात नाना पटोले यांचं कौतुक करताना देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोले लगावले. परत येईल म्हणून सांगितलं पण कुठे बसणार हे त्यांनी सांगितलं नव्हतं.. असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.
पुढील पाच वर्षे सत्तेत येण्याचा प्रयत्न करु नये. कोणत्याही बाजूच्या सदस्यांना जागा सोडायला लावू नका. तुम्ही आमचे नेते आहात, अशी पाटलांची तुफान टोलेबाजी विधानसभेत आज पाहायला मिळाली.
दुसरीकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फडणवीसांना टोला लगावण्याची संधी सोडली नाही. देवेंद्र फडणवीसांकडून आम्ही पाच वर्षे खूप शिकलो. तुम्ही माझे मित्र होतात हे मी कधीही लपवलं नाही. ते आमचं हिंदुत्व होतं. दिलेला शब्द पाळणे हे पण आमचं हिंदुत्व… पण दिलेला शब्द न पाळणं हे आमचं हिंदुत्व नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
नाना पटोलेंना कृषिमंत्री पद मिळेल अशी अपेक्षा होती मात्र… – देवेंद्र फडणवीस- https://t.co/7kaM1tFJa4 @nanapatole @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
“महाराष्ट्राला पहिल्यांदा काळ्या केसाचा अध्यक्ष लाभला” – https://t.co/vaCtJL8yNO @Awhadspeaks @NANA_PATOLE
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेतली त्यावर चंद्रकांत पाटील म्हणतात… – https://t.co/JlSsA9oIP5 @ChDadaPatil
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019