राज्यभरात शिवरायांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जाणार- जयंत पाटील

मुंबई | कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडीओ शुक्रवारी रात्री व्हायरल (Viral Video) झाला होता. विटंबना केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत.

बंगळुरुतील या घटनेचा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून निषेध केला जातोय. या घटनेच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी सांगली जिल्ह्यातल्या मिरजमध्ये कर्नाटकातील गाडी खासगी गाड्यंची तोडफोड केली आहे. तर तिकडे बेळगावातही शिवप्रेमींची अडवणूक करण्यात आली आहे.

शिवाजी गार्डन इथं छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या शिवप्रेमींनी कर्नाटक पोलिसांनी रोखलं होतं. या तणावाच्या पार्श्वभूमीवर 144 कलम बेळगावात लागू करण्यात आलं असून मोठा पोलीस फौजफाटाही या भागात पाहायला मिळतोय. या घटनेचा सर्वच पक्षाच्या नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

कर्नाटकात काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या, दिनांक 19 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन महाराजांना दुधाचा अभिषेक करतील, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं.

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. उद्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी अभिवादन करतील, असं जयंत पाटील यांनी ट्वीटरवरुन जाहीर केलं आहे.

दरम्यान, संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी बंगळूर येथे विटंबना केल्याचं समजलं. हा प्रकार अत्यंत संताप आणणारा आहे, असं जयंत पाटील म्हणालेत.

मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या घटनेचा तीव्र निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहे. आमच्या अस्मितेचा कोणी अपमान करत असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. कर्नाटक सरकारने या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘बंगळुरूतील त्या समाजकंटकांना शोधून काढा’; अजित पवारांचा कर्नाटकला इशारा 

‘…तसं महाराष्ट्रात पुन्हा झाल्यास सोडायचं नाही’; राज ठाकरेंचा इशारा  

अजित पवारांकडून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन; ‘या’ कृतीची महाराष्ट्रभर चर्चा 

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट” 

“लग्नाला उशीर केल्यास मुली पॉर्न पाहत बसतील, त्यामुळे वयात आल्यावर त्याचं लग्न लावा”