“देशातील चित्र बदलेल, इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता हे विसरू नका”

सांगली | जगात सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही आलेले नाही, देशात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही पराभव झालेला होता हे कधी विसरू नका. त्यामुळे देशातीलही चित्र बदलेल असा विश्वास राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

आपल्या देशाची अर्थव्यवस्था कुठे चालली आहे असा सवाल करत जयंत पाटील म्हणाले की, मोदींच्या काळात पेट्रोल किती वाढलेय हे लोकांना जाऊन सांगणे गरजेचं आहे, असंही त्यांनी म्हटलंय. ते सांगलीत बोलत होते.

प्रयत्नार्थी परमेश्वर, त्यामुळे प्रयत्न करा, कामाला लागा. शाहू, फुले, आंबेडकराचा एक वेगळा विचार आहे. जातीयवाद आणि त्याचे काय परिणाम या देशात होतायत हे आज सर्वजण पाहत आहेत, असं ते म्हणालेत.

मोदींनी पेट्रोलचे दर किती वाढवले, आधीचे मनमोहन सिंग यांचे सरकार बरं होतं हे महिलांना आणि ग्रामस्थांना पटवून दिले की ही लोक पुन्हा कशाला कमळाला मतदान करतील. लोकांचे प्रश्न कसे सोडवले पाहिजेत हे समजावण्याची गरज आहे, असंही ते म्हणालेत.

कुठलीही संघटना विचारांवर अधारीत असेल तर कार्यकर्ते झपाटून काम करतात. तुम्ही लोकांशी संपर्क ठेवल्याशिवाय लोक तुम्हाला प्रतिसाद देत नाहीत. त्यासाठी आपले सैन्य तयार पाहिजे. त्यामुळे बुथ कमिट्या सक्षम करा, असं ते म्हणाले.

आता जमाना बदलला आहे. संपर्काचे तंत्र बदलले आहे. प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत आपल्याला पोहचले पाहिजे. प्रत्येक बुथवर दहा कार्यकर्ते असतील तर तुमच्या एका निरोपावर जवळपास साडेतीन हजार कार्यकर्ते तत्पर हजर असतील, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भावाला समजावून सांगावं, नाहीतर…”