“गोंधळलेल्या अर्थमंत्र्यांनी गोंधळलेला अर्थसंकल्प मांडला”

मुंबई | देशाची अर्थव्यवस्था गोंधलेली आहे आणि त्यात गोंधळलेल्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला. देशात मंदीचे वातावरण आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात काहीच नाही अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

भारतात सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो मात्र या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काहीच मिळालेले नाही. अर्थव्यवस्थेला गती देण्यासारखं या अर्थसंकल्पात काही सांगितलं नाही. रस्त्याच्या कामांसाठी सरकारकडे पैसे नाही मात्र आज मोठ्या घोषणा केल्या गेल्या आहेत, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

जीएसटीमुळे अनेक राज्याचे झालेले नुकसान कधी देणार… महाराष्ट्राचेही पैसे अजून मिळाले नाहीत ते कधी मिळणार असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचं योगदान सर्वात जास्त आहे. मात्र तरीही केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्र गायब असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या- 

-मोदी सरकारच्या बजेटवर रोहित पवारांचं टीकास्त्र; म्हणाले ‘हा तर गंडवागंडवीचा अर्थसंकल्प’!

-“नशिब ही गोष्ट जेवणापुर्ती मर्यादित राहिली नाहीतर गांधीजींच्या आत्म्यानं स्वर्गात आपलं चैतन्य गमावलं असतं”

-अहो आव्हाडजी, अदिवासींच्या घरात खुर्च्या, टिपोय, मिनरल वॉटर कुठून आलं?

-सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात असहकार; नगरमधील इसळक ग्रामपंचायतीचा ठराव

-सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात असहकार; नगरमधील इसळक ग्रामपंचायतीचा ठराव