सांगली | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर सडकून टीका केली. याला मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादी आणि खासकरुन शरद पवार यांच्यावर बोललं तरच कव्हरेज मिळतं. त्यामुळे राज ठाकरे सतत शरद पवार यांच्यावर बोलत आहेत, असं जयंत पाटील म्हणाले. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.
राज ठाकरेंवर ईडीचा किंवा अन्य कोणता तरी दबाव असल्याने आणि त्यांनी फक्त शरद पवारांच्यावर बोलायचं, बाकी काही बोलायचं नाही असं सांगितलं गेल्याने राज ठाकरे केवळ शरद पवार यांच्यावर बोलतात, असं जयंत पाटील म्हणालेत.
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांकडूनही भाषणाबाबत पूरक टायमिंग साधून टीव्ही मीडिया व्यापून घेण्याचा प्रयत्न अचूक झाला. यातून मिलीभगत आहे हे सिद्ध होतेय, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे औरंगाबादच्या सभेतील एकदा काय ते होऊनच जाऊ द्या, हे वक्तव्य महाविकास आघाडी सरकारने अत्यंत गंभीरपणे घेतलंय, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
राज्यात दंगे करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास कारवाई तितकीच कठोर असेल, असा इशारा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पुतिन यांना झालाय गंभीर आजार; तब्येतीमुळे ‘हा’ मोठा निर्णय घेणार?
8 जागतिक नेत्यांसोबत 65 तास, 25 बैठका; नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यासाठी रवाना
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रूग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
‘भोंगे उतरवण्याने…’; राज ठाकरेंच्या भाषणानंतर आनंद दवेंचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंच्या भाषणावर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया, म्हणाले…