औरंगाबाद महाराष्ट्र

बीडचं रुप झपाट्यानं बदलणार; जयदत्त क्षीरसागरांचा विश्वास

बीड : बीडचा विकास डोक्यात ठेऊनच कामाला लागलो आहोत. अनेक प्रकल्प आता मार्गी लागत आहेत. बीडचे रूप झपाट्याने बदलणार आहे. फक्त तुमची साथ हवी आहे, असा विश्वास शिवसेनेचे नेेते जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त  केला आहे.

18 कोटी रूपयांच्या बसस्थानकाचा शुभारंभ आज होत आहे. 200 खाटाचे रूग्णालय देखील होणार आहे, अशी माहिती क्षीरसागरांनी दिली आहे. 

रविवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बीडमध्ये जाणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे, असं आवाहनही क्षीरसागर यांनी केेलं आहे. 

आदित्य ठाकरे हे बीडच्या नवगण कॉलेजच्या प्रांगणात महिला आणि विद्यार्थीनींशी संवाद साधणार आहेत. मुलभूत आणि पायाभूत विकासाची कामं करण्यासाठी आणि पक्ष बळकट करण्यासाठी आपण आता प्रयत्न करणार आहोत, असंही क्षीरसागर म्हणाले आहेत. 

दरम्यान, बैठकीला जिल्हाप्रमुख पुंडलिक खांडे, सचिन मुळीक, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जगदीश काळे, विलास बडगे, दिनकर कदम, दिलीप गोरे, बप्पासाहेब घुगे, जयसिंग चुंगडे, बाळासाहेब आंबुरे आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

-“राज ठाकरेंना कोणताच उद्योगधंदा नाही”

-“राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीमुळे शरद पवार जखमी”

-“काट्याने काटा काढायला आम्ही काय मेलेल्या आईचं दुध पिलंय का?”

-मुख्यमंत्री म्हणतात….युतीचा ‘फिफ्टी-फिफ्टी’ फार्मुला जरा वेगळाच!

-उपमुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट!

IMPIMP