कोल्हापूर | राज्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानं शोककळी पसरली आहे. अशातच आता लता मंगेशकर यांच्या स्मारकावरुन राज्यातील वातावरण चांगलंच पेटलं आहे.
सगळीकडे स्मारकावरुन वाद निर्माण झालेला असताना कोल्हापूरमधील जयप्रभा स्टुडिओ आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मारकाची मागणीवरून सध्या कोल्हापूरातील वातावरण चांगलंच तापलं आहे.
जयप्रभा स्टुडिओ स्थानिक शिवसेना नेते राजेश क्षीरसागर मुलांसह काही बड्या व्यापाऱ्यांनी खरेदी केल्याचं समोर आलं आहे. यावरुन सध्या वातावरण गरम असल्याचं पहायला मिळत आहे.
जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याच्या मागणीसाठी आजपासून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्यावतीनं बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं आहे. जयप्रभा स्टुडिओवरुन वाद निर्माण झाला असताना शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
व्यवहारात बेकायदेशीर काय झालं? माझ्या मुलांनी जर काही बेकायदेशीर केलेलं आढळलं, तर त्यासाठी मी जबाबदार असेल. तसं असेल तर मी राजकीय सन्यास घेईन, अशी भूमिका राजेश क्षिरसागर यांनी मांडली आहे.
जयप्रभाचं महालक्ष्मी स्टुडिओमध्ये रुपांतर झालं, अजिबात मला माहिती नाही. कारण माझा मुलगा सज्ञान आहे. त्याचा बांधकाम व्यवसाय आहे. जर त्यानं बेकायदेशीर असं काही केलं असेल, तर मी त्याल आजच्या आज जनतेची माफी मागायला सांगितलं असतं, असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.
भारतीय राज्यघटनेने एखादी खासगी जागा खरेदी आणि विक्रीचा अधिकार या देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे. त्या पद्धतीने हा व्यवहार झालेला आहे. फक्त जनतेच्या भावनांचा आदर करून आपण सर्व योग्य ते निर्णय घेणार असल्याचंही क्षीरसागर यांनी म्हटलं.
आमचं चुकलं असेल तर आम्हाला फासावर द्या, मी स्वाभिमानी नक्कीच आहे परंतु अहंकारी नाही. माझं चुकलं असेल तर मी माफी मागायला तयार आहे. माझी मुलं चुकली असतील तरी माफी मागायला तयार आहे, असं क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.
जयप्रभा स्टुडिओवरुन तापलेल्या वातावरणात पुढे काय होणार, काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
येत्या 24 तासांत ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता
“मी वाघाचा मुलगा आहे, नरेंद्र मोदींना सत्तेतून हाकलून देईन”
“चंद्रकांत पाटील मोठे व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याने बोलणं योग्य नाही”
“जेवढं भुंकायचं तेवढं भुंका, करारा जवाब मिलेगा!”
“पवार शिवसेना नेत्यांना योग्य वागणूक देत नाहीत, निधी देताना त्यांच्यात उपकाराची भावना असते”