कर्नाटकातील राजकीय नाट्याला वेगळं वळण; ‘हा’ पक्ष देणार भाजपला पाठिंबा???

बंगळुरु : कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस यांचं सरकार कोसळल्यानंतर आता भाजपचं सरकार स्थापन झालं आहे. त्यानंतर कर्नाटकातील राजकीय नाट्याला एक वेगळंच वळण लागलं आहे. सत्तेतून बाहेर असलेल्या जेडीएसच्या आमदारांनी भाजपला बाहेरुन पाठिंबा देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

येडियुरप्पा यांच्या सरकारला बाहेरुन पाठिंबा देऊ किंवा त्यांच्या सरकारमध्ये सहभागी होऊन समर्थन देता येईल, असं जेडीएसच्या आमदारांनी माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना सुचवलं आहे.

आमदारांनी हा निर्णय कुमारस्वामी यांच्यावर सोडला आहे. तसंच कुमारस्वामी जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असंही जेडीएसच्या आमदारांनी सांगितलं आहे.

जेडीएसच्या विधीमंडळ सदस्यांची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत आमदारांच्या एका गटाने भाजपला बाहेरुन पाठिंबा देण्यात यावा अशी मागणी केली आहे. तर आमदारांच्या दुसऱ्या गटाने विरोधी पक्षात बसावं असं सुचवलं आहे, अशी माहिती जेडीएसचे नेते जी. टी. देवेगौडा यांनी दिली आहे.

येडियुरप्पा यांनी 105 आमदारांचा पाठिंबा असल्याचे शुक्रवारी सकाळी सत्तास्थापनेचा दावा करताना राज्यपालांना सांगितले. मात्र ही संख्या बहुमतासाठी पुरेशी नाही. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी किती आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे, हे स्पष्ट होईल.

दरम्यान, भाजपचे नेते येडियुरप्पा यांनी शुक्रवारी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी नंतर राज्यपाल वजुभाई वाला यांनी 31 जुलैपर्यंत येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-चित्रा वाघ यांनी राजीनाम्याचं ट्वीट केलं अन् लोकं म्हणाले; ‘ताई तुम्हीसुद्धा…!’

-एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये येतील; ‘या’ नेत्याचा दावा!

-या कारणामुळे चित्रा वाघ यांची ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ला सोडचिठ्ठी???

-राणा जगजितसिंह पवारांना धक्का देणार??; राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार!

-राष्ट्रवादीला खिंडार; चित्रा वाघ ‘या’ दिवशी भाजपात प्रवेश करणार???