Top news

‘जीने मेरा दिल लुटया…’; चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

Photo Credit- Twitter/@SainRajat

सोशल मीडियावर आज काल आपण अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर लहान मुली-मुलांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात.

आपण पाहतो की सोशल मीडियावर अनेक डान्सचे, गाणं म्हणतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. परंतू सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा गाण म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओ एक लहान मुलगा एक गाणं म्हणत आहे. व्हिडीओतील मुलगा केवळ एक ते दीड वर्षाचाच असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. त्या लहान मुलाची आई गाणं म्हणत आहे आणि तो लहान मुलगा आपल्या आईच्या आवाजात सूर लावत आहे.

तो लहान मुलगा ‘जवानी जानेमन’ या हिंदी चित्रपटामधील ‘जिने मेरा दिल लुटया’ हे गाणं म्हणत आहे. त्याचा हा व्हिडीओपाहून अनेकजण त्या लहान मुलाच्या प्रेमात पडले आहेत.

तसेच हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ ‘सेन रजत’ या युजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ‘इस से क्यूट आज कुछ दिखे तो बताइएगा’ असं कॅप्शनही दिलं आहे.
त्याचप्रमाणे हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ तीन हजार लोकांनी पाहिला असून, या व्हिडीओला अनेकांनी वेगवेगळ्या कमेंटही केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

चक्क कुत्राही करतोय विकेंडची तयारी, पाहा व्हिडीओ

आता हेच पाहायचं राहिलं होत; चक्क गाई खेळतीय फुटबॉल, पाहा…

‘सलमान खान माझे कपडे आणि चप्पल सांभाळायचा’,…

‘देऊळबंद’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी…

सॅनिटायझरच्या चुकीच्या वापरामुळे कारला लागली आग…